News Flash

रणबीर-आलियाचे वाराणसीतील हे फोटो पाहिलेत का?

आलिया व रणबीर एकत्र असल्याच्या अनेक चर्चा सिनेसृष्टीत आहेत.

रणबीर- आलिया

‘राजी’, ‘गली बॉय’, ‘कलंक’ अशा चित्रपटांमुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या हे दोघंही वाराणसीमध्ये शूटिंग करत आहेत. शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रणबीर व आलियाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.

आलिया व रणबीर एकत्र असल्याच्या अनेक चर्चा सिनेसृष्टीत आहेत. त्यातच भर म्हणजे या फोटोंमुळे अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. एका फोटोत आलिया व रणबीर एका बोटमध्ये बसले आहेत तर दुसऱ्या फोटोत या जोडीने हात पकडले आहेत. आलियाने पांढरा टी-शर्ट, जीन्स व लाल श्रग घातले असून रणबीरने हिरवा शर्ट व जीन्स घातली आहे. चित्रपट निर्माते किंवा आलियाने हे फोटो शेअर केले नसून त्यांच्या चाहत्यांनी हे फोटो व्हायरल केले आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर महत्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकणार असून बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटामध्ये उत्तम स्टारकास्टचा समावेश करण्यात आला असून चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी अयान मुखर्जी यांना तब्बल पाच वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला होता.त्यामुळे चित्रपटाची कथा दमदार असेल यात शंका नाही. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे.

‘कलंक’ नंतर आलिया करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ सिनेमात दिसणार आहे. ‘संजू’ नंतर आता ‘शमशेरा’मध्ये रणबीर दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 1:29 pm

Web Title: pics alia bhatt ranbir kapoor brahmastra varanasi
Next Stories
1 नाटकाचं तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला?- सुमीत राघवन
2 पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहण्यास आवडेल – प्रियांका चोप्रा
3 सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली बॅट रणवीरने तब्बल इतक्या रकमेत घेतली विकत
Just Now!
X