News Flash

करीनाच्या धाकट्या मुलाचा फोटो रणधीर कपूर यांनी केला शेअर?

हा फोटो नक्कीच पाहा

बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूर खानने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करीना आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल आता पर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, आता आजोबा रणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रणधीर कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावाचे दोन फोटो कोलाज करून रणधीर यांनी शेअर केले होते. मात्र, त्यांना तो फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा नव्हता. कारण, शेअर केल्याच्या कही क्षणातच त्यांनी तो फोटो डीलीट केला. त्यांनी तो फोटो डीलीट केला असलां तरी सुद्धा तो फोटो काही नेटकऱ्यांनी पाहिला होता. रणधीर यांनी हा फोटो डीलीट केल्या नंतर, नेटकऱ्यांनी लगेच तैमूरच्या धाकट्या भावाचे फोटो व्हायर केले.

या आधी करीनाने तिच्या धाकट्या मुलाचा फोटो ‘जागतिक महिला दिन’च्या निमित्ताने शेअर केला होता. मात्र, त्या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावचा चेहरा दिसला नाही. तर २१ फेब्रुवारी रोजी करीनाने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. करीना आणि सैफने त्यांच्या मुलाबद्दल अजून कोणतीही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 10:13 am

Web Title: picture of kareena kapoor khans second son gets leaked accidentally by randhir kapoor dcp 98
Next Stories
1 असं मिळेल करोनावर नियंत्रण; राखी सावंतने सांगितला उपाय!
2 अब्रुनुकसानी प्रकरणी कंगनाला दिलासा नाहीच
3 चित्रीकरण स्थळांवर चिंता आणि दक्षताही!
Just Now!
X