20 September 2020

News Flash

PHOTOS: … चालू वर्षात या सेलिब्रिटी किड्सचा पहिलावहिला बर्थडे बॅश

२०१६ मध्ये बऱ्याच सेलिब्रिटींच्या जीवनात काही नव्या पाहुण्यांचं आगमन झालं.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

Celebrity Kids सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यावरही चाहत्यांच्या नजरा असतात. मुख्य म्हणजे कोणता सेलिब्रिटी कोणाला डेट करतो आहे इथपासून ते कोणत्या सेलिब्रिटीला किती मुलं आहेत असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. मग या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आधार घेतला जातो तो म्हणजे सोशल मीडियाचा. याच सोशल मीडियावरुन सेलिब्रिटींच्या मुलांचे फोटोही नेहमीच व्हायरल होत असतात.

२०१६ हे वर्ष काही सेलिब्रिटींसाठी सर्वच दृष्टींनी महत्त्वाचं ठरलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत मिळालेल्या यशासोबतच या कलाकारांच्या जीवनात काही नव्या पाहुण्यांचं आगमन झालं. स्वप्निल जोशी, डिंपी गांगुली, चाहत खन्ना या आणि अशा सेलिब्रिटींच्या जीवनात आलेले हे पाहुणे एक वर्षाचे होत आहेत. त्यामुळे आपल्या चिमुरड्यांसाठी २०१७ या वर्षात सेलिब्रिटी बिग बॅश पार्ट्यांचं आयोजन करणार यात शंकाच नाही. चला तर मग.. जाणून घेऊया हे सेलिब्रिटी किड्स आहेत तरी कोण…

स्वप्निल जोशी- मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजेच स्वप्निल जोशी आणि त्याची पत्नी लीना यांच्या घरी २३ मे २०१६ रोजी छोट्या परी राणीचं आगमन झालं. स्वप्निलने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘मायरा’ असं ठेवलं.
swapnil

डिंपी गांगुली- रिअॅलिटी शो आणि बऱ्याच चर्चांमुळे प्रकाशझोतात आलेल्या डिंपी गांगुलीने मोठ्या आनंदात संसार थाटत आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. जून २०१६मध्ये डिंपी आणि तिच्या पतीच्या आयुष्यात निरागस ‘रेआना’चं आगमन झालं.
dimpy

चाहत खन्ना- ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमध्ये साक्षी तन्वरच्या बहिणीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री चाहत खन्नाने ९ सप्टेंबर २०१६ला ‘झोहरा’ला जन्म दिला.
chahat-khanna

रोहित खुराना- टेलिव्हिजन अभिनेता रोहित खुरानासुद्धा बाप होण्याचं सुख अनुभवत आहे. एप्रिल २०१६ मध्ये त्याच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं होतं.
rohit-khurana

करणवीर वोहरा- एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता करणवीर वोहरा आणि त्याची पत्नी टीजेसुद्धा सध्या आई-बाबांच्या भूमिकेत चांगलेच रुळले आहेत. ‘मिको’ आणि ‘नोनू’लाच करण-टीजे प्राधान्य देत आहेत.
श्वेता तिवारी- ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री श्वेता तिवारीसुद्धा एका मुलाची आई झाली आहे. २७ नोव्हेंबर २०१६ला श्वेताने गोंडस बाळाला जन्म दिला.
karanvir-bohra

शबिर अहलुवालिया- ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेमुळे तरुणींच्या गळ्यातलं ताईत बनलेला अभिनेता शबिर अहलुवालियाच्या घरी फेब्रुवारी २०१६ मध्ये आणखी एका पाहुण्याचं आगमन झालं.
shabir

सलमान युसूफ खान- ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धी मिळालेला सलमान युसूफ खानही एक पिता आहे. आपल्या नृत्यशैलीच्या बळावर नाव कमवलेला सलमानच्या जीवनात मार्च २०१६मध्ये छोट्या डान्सर सलमानचं आगमन झालं.
salman

कॅरल ग्रेशिअस- मॉडेलिंग विश्वातील प्रसिद्ध नाव म्हणजे कॅरल ग्रेशिअस. गरोदरपणासापून एका मुलाला जन्म दिल्यानंतरही कॅरलचं फॅशन जगतातील स्थान अबाधित आहे. जुलै २०१६ मध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.
carol

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:00 pm

Web Title: pictures of tv celebs with their kids who will turn 1 this year swapnil joshi dimpy ganguly shabir ahluwalia
Next Stories
1 जस्टिनच्या कार्यक्रमाचे तिकीट ईएमआयवर उपलब्ध!
2 सेलिब्रिटी लेखक : आठवणीतली सुट्टी
3 वेस्टर्न लूकला तेजस्विनीचा मराठमोळा तडका!
Just Now!
X