News Flash

‘पान बहार तंबाखू उत्पादन असल्याचे माहित नव्हते’

पिअर्स ब्रॉस्नॅन यांनी मागितली माफी

पान बहार या उत्पादनाबद्दल चुकीची माहिती मला मिळाली होती- पिअर्स ब्रॉस्नॅन

हॉलिवूड अभिनेता पिअर्स ब्रॉस्नॅनला ओळखता का असा प्रश्न कोणाला विचारला आणि त्याचे उत्तर नाही असं आलं तरच नवलं. हॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये पिअर्स ब्रॉस्नॅनचे नाव येते. फॅन्सी कारमधून सुंदर मुलींसह उतरणारा हा जेम्स बॉन्ड आपण आजवर पाहत आलोय. काही दिवसांपूर्वी त्याची पान बहारची जाहिरात टीव्हीवर पाहायला मिळत होती. जेम्स बॉन्ड आणि पान बहारची जाहिरात करतोय हे पाहिल्यावर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण त्याने ही जाहिरात का केली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.

मुळात पिअर्स ब्रॉस्नॅनला पान बहार हे एक तंबाखू उत्पादन आहे हे माहितीच नव्हते. हा एक मुखवासाचा पदार्थ आहे असेच त्याला वाटत होते. जेव्हा त्याला कळले की हे उत्पादन शरीरास हानिकारक आहे तेव्हा त्याने या कंपनीबरोबरचा करार मोडीत काढला.

त्याने यावेळी त्याच्या चाहत्यांचीही माफी मागितली आहे. ‘मला माफ करा मला माहित नव्हते की हे तंबाखु उत्पादन आहे.’ भारतात कोणत्याही तंबाखू उत्पादनावर तंबाखू खाल्याने कर्करोग होतो अशी सूचनाही लिहिलेली असते.
‘माझ्या खाजगी आयुष्यात माझी पहिली बायको, मुलगी आणि अनेक मित्र कर्करोगामुळे दगावले आहेत. त्यामुळे मला या गोष्टीचं अधिक गांभीर्य आहे. मी स्वतः महिलांच्या आरोग्याशी निगडीत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो,’ असे स्पष्टीकरण त्याने दिले.

पिपल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रॉस्नॅनसोबत जो करार करण्यात आला त्यात पान बहारच्या उत्पादनांचा उल्लेख मुखवास/दातानां चकाकी आणणारे उत्पादन असा करण्यात आला होता. याशिवाय फक्त पान बहार या एका उत्पादनाची जाहिरात करण्याचे ठरले होते. पान बहारमध्ये सर्व नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. पण यात तंबाखू, सुपारी किंवा तत्सम शरीराला घातक गोष्टींचा वापर न केल्याचे त्यांनी म्हटले होते. या जाहिरातीतून त्याचे नाव काढण्याचे त्याने या उत्पादन कंपनीला सांगितले आहे. मी कोणाचेही आरोग्य धोक्यात घालू इच्छित नाही.

या एक मिनिटाच्या जाहिरातीत दाढी वाढलेला आणि सूटबूटमधील पिअर्सचा दिमाखदार लूक पाहावयास मिळतो. त्यानंतर तो पान मसालाचा डबा उडवत आपल्या बॉन्ड स्टाइलमध्ये शत्रूंशी कसे दोन हात करतो ते पाहण्यासाठी तुम्हाला जाहिरात पाहावी लागेल. दरम्यान, ही बातमी कळताच साहजिकच नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. ट्विटरवर, पिअर्सच्या चाहत्यांनी काही मजेशीर ट्विट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:12 pm

Web Title: pierce brosnan pan bahar ad contract violation
Next Stories
1 वैदर्भीय रंगकर्मीची टीव्ही मालिकेत दमदार एंट्री
2 सोनाली आणि संदेश कुलकर्णी सोबत रंगला भाऊबीजचा खास भाग
3 सलमानसाठी लुलियाने केलेला करवा चौथ?
Just Now!
X