News Flash

जातीवाचक वक्तव्य केल्याने सलमान- कतरिना अडचणीत

कार्यक्रमामध्ये सलमानने 'भंगी' हा शब्द वापरला

सलमान खान, कतरिना कैफ

सलमान खान आणि कतरिना कैफविरोधात जातीवाचक विधान केल्याबाबद तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी, दिल्ली कमीशनचे माजी चेअरमन हरमन सिंह यांनी केली आहे. हरमन यांनी यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. एका टीव्ही शोमध्ये ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या प्रमोशनला सलमान आणि कतरिना गेले होते.

या कार्यक्रमामध्ये सलमानने ‘भंगी’ हा शब्द वापरला. तेव्हा सलमानला रोखण्याऐवजी कतरिनाही त्याच्या त्या वाक्यावर हसताना दिसली. यामुळे या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी हरमन यांनी केली आहे. या प्रकरणावर २७ फेब्रुवारीला निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत न्यायालयाने दिल्ली पोलिसांना यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही सलमान त्याच्या बेधडक विधानांमुळे अडचणीत आला होता. याआधीही टीव्ही शोदरम्यान सलमान आणि शिल्पा शेट्टीने जातीवर केलेल्या विधानामुळे अडचणीत आले होते. हे प्रकरण शांत होते न होते तोच सलमानच्या एका नव्या वादाने डोकं वर काढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 4:42 pm

Web Title: pil filed against salman khan katrina kaif for making casteist remarks salman khan katrina kaif tiger zinda hai promotions salman katrina legal case
Next Stories
1 वैभव तत्ववादी- अंकिता लोखंडे यांच्या नात्यात नवा बहर
2 भावनिक, नैराश्यग्रस्त होणं मला परवडणारं नाही- सलमान खान
3 PHOTO : ‘त्यांच्या’ हसण्यावर खिलाडी कुमार भाळला
Just Now!
X