18 February 2020

News Flash

Video : हृतिकची आईदेखील भन्नाट डान्सर

पिंकी रोशन यांचा डान्स एकदा पाहाच

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणार हृतिक रोशन सध्याच्या घडीला त्याच्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखला जातो. धूम, वॉर या चित्रपटातील त्याच्या अॅक्शन सीनसोबतच त्याचा डान्सही तुफान लोकप्रिय झाला होता. परंतु केवळ हृतिकचं नाही तर त्याची आई पिंकी रोशनदेखील सुंदर नृत्य करतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अलिकडेच हृतिक त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राजस्थानला फिरायला गेला होता. यावेळचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.याच पिकनिकमधील त्याच्या आईचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात त्या डान्स करताना दिसत आहेत.
हृतिकच्या आईने ‘वॉर’ चित्रपटातील ‘घुंगरु’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी त्या एकट्या नसून त्यांच्यासोबत घरातील अन्य दोन महिलादेखील होत्या. विशेष म्हणजे पिंकी रोशन या वयामध्येही उत्तम डान्स करत असल्याचं दिसून येतं

 

View this post on Instagram

 

# @neenasuri @kanchan_roshan

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on

 वाचा : हृतिकच्या घरापुढं 5 star हॉटेलही फिकं; लिव्हिंग रुम पाहून विस्फारतील डोळे

दरम्यान, याच पिकनिकमध्येच सुनैनाचा वाढदिवसदेखील सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. अलिकडेच हृतिकचा ‘वॉर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफने स्क्रीन शेअर केली आहे.

First Published on January 27, 2020 10:00 am

Web Title: pinki roshan dance on his son rithik roshan film war song ghungroo ssj 93
Next Stories
1 ‘तान्हाजी’मध्ये रायबाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने केलंय या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम
2 या अभिनेत्रीने रिक्षासाठी विकली कार, कारण..
3 विनोदी अंगाने सामाजिक संदेश देणारं ‘सनी तूच माझ्या मनी’ नाटक
Just Now!
X