25 October 2020

News Flash

‘सुपर ३०’च्या गाण्यावर हृतिकच्या आईचा डान्स पाहिलात का?

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आई ६४ वर्षांची आहे. या वयातही त्या जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत असतात. नुकताच पिंकी यांनी त्यांचा डान्स करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वयाच्या ६४व्या वर्षी देखील त्यांना नृत्य करताना पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत.

पिंकी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्या जिममध्ये नृत्य करताना दिसत आहेत. त्यानंतर त्या मुलगा हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटातील ‘जोगराफिया’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत पिंकी यांनी ‘सुपर ३०च्या यशाचा वर्कआऊट’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

हृतिकचा ‘सुपर ३०’ नुकताच प्रदर्शित झाल असून या चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन याची मुख्य भूमिका आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट शुक्रवारी (१२ जुलै) प्रदर्शित झाला. कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आनंद कुमार संघर्ष करत राहिले. त्यांचा हाच जीवनप्रवास ‘सुपर ३०’मधून उलगडण्यात आला आहे.

सध्या हृतिक रोशन सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यामधील ऑनस्क्रीन टक्कर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि टायगरची ऑनस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 12:19 pm

Web Title: pinky roshan share dance video on instagram avb 95
Next Stories
1 Video : हिमेश रेशमियामुळे दीपिकाला मिळाला होता ‘ओम शांती ओम’?
2 अर्जुन रामपालने शेअर केला मुलासोबतचा पहिला फोटो
3 ‘सुपर ३०’ची सेंच्युरी!
Just Now!
X