पायरेट्स ऑफ द कॅरीबियन ही चित्रपटाची सिरीज माहिती नाही असे प्रेक्षक फार विरळाच. पायरेट्स ऑफ द कॅरीबियन या चित्रपटाचा पहिला भाग २००३मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाच्या सीरिजने साऱ्यांवर मोहिनी घातली. १८व्या शतकातील कथानक, तोडीचे सुपरस्टार यामुळे या चित्रपटांनी वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शनला एक नवी ओळख मिळवून दिली.

हा चित्रपट काल्पनिक असून चित्रपटाचे कथानक हे १८ व्या शतकात अस्तित्वात असलेले पायरेट्स म्हणजेच समुद्री चाचे यांच्यावर आधारित आहे. या सिरीजमधील नायक म्हणजे कॅप्टन जॅक स्पॅरो. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप याने या सिरीजमध्ये जॅक स्पॅरो याची भूमिका वठवली असून ती भूमिका अजरामर केली आहे. पण जॅक स्पॅरो हे पात्र कोणत्या व्यक्तिरेखेवरून सुचलं आहे, महिती आहे?

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
aarti singh wedding rumors (1)
लाल साडी, केसात गजरा अन् घरी सजावट! गोविंदाच्या भाचीच्या लग्नाची तयारी सुरू, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Phulala Sugandh Maticha fame actress aditi deshpande will play role in Lagnachi Bedi marathi serial
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

या चित्रपटातील जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आधारित असल्याचे चित्रपटाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने सांगितले आहे. या चित्रपट सिरीजचे पटकथा लेखक (स्क्रीनरायटर) टेड एलियट यांनी हि माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जॅक स्पॅरो हे पात्र हे भगवान श्रीकृष्ण यांच्या विविध छटांवर आधारित रेखाटले गेले आहे.

एलियट यांच्या या माहितीनंतर सोशल मीडियामध्ये VIRAL झालेला एक फोटो

जॅक स्पॅरो हे पात्र पायरेट्स ऑफ द कॅरीबियन चित्रपटांमधील सर्वात महत्वाचे पात्र आहे. हे पात्र भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आधारित आहे. जॅक स्पॅरो हे पात्र कसे असेल, याचा जेव्हा विचार सुरु होता त्यावेळी आम्ही भगवान श्रीकृषच्या आयुष्याचा अभ्यास केला. त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा अभ्यास केला. या अभ्यासाचा आम्हाला जॅक स्पॅरो हे पात्र रंगवताना खूपच उपयोग झाला, असे एलियट यांनी सांगितले.