News Flash

आमिर खानच्या ‘त्या’ पोस्टरविरुद्ध याचिका

कानपूरमधील एका वकिलाने सत्र न्यायालयात आमिरच्या सदर पोस्टवरून याचिका दाखल केली आहे.

| August 2, 2014 12:31 pm

बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान आगामी ‘पीके’ चित्रपटाच्या पोस्टरमुळे वादाच्या भोव-यात सापडला आहे.  पूर्ण निर्वस्त्र आणि हातात फक्त एक रेडिओ असे आमिरचे छायाचित्र असलेला पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित झाला. काहींनी आमिरच्या या पोस्टरला प्रसिद्धिची कल्पना समजून त्याची प्रशंसा केली तर काहींनी मात्र हे पोस्टर अश्लिल असल्याची तक्रार केली.
पाहाः आमिरच्या ‘पीके’ चित्रपटाचे थक्क करणारे पोस्टर
कानपूरमधील एका वकिलाने सत्र न्यायालयात आमिरच्या सदर पोस्टवरून याचिका दाखल केली आहे.  मनोज म्हणाले की, जेव्हा माझ्या घरी सकाळी वृत्तपत्र आले त्यावेळेस आमिरचे हे पोस्टर पाहून मी थक्कच झालो. करोडो लोकांपर्यंत वृत्तपत्र जातात. त्यात लहान मुलांचा आणि वृद्धांचाही समावेश असतो. या पोस्टरमुळे समाजात अश्लिलता तसंच लैंगिक अत्याचार वाढतील, असे मनोज कुमार यांनी याचिकेत म्हटले. या प्रकरणी चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख, आमिर खान, निर्माते विधू विनोद चोप्रा व दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्याविरोधात आयपीसी २९२ कलमाअंतर्गात खटला दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 12:31 pm

Web Title: pk poster lands aamir khan in legal trouble
Next Stories
1 सलमानच्या ‘किक’ची १७८.२८ कोटींची कमाई!
2 सलमानबद्दलच्या प्रश्नांनी कंटाळलोय- शाहरुख
3 कतरिना कैफला आता अभिनयाचीही संधी!
Just Now!
X