News Flash

’फादर्स डे’च्या निमित्ताने ‘जून’ टीमकडून सर्व ‘बाबां’ना अनोखी भेट, बाबांसाठी खास गाणं

"मी नक्कीच आईच्या खूप जवळ आहे मात्र मी बाबांसारखी आहे."- नेहा पेंडसे

बाबा… आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती, जे आपल्या पाल्याला आनंदी ठेवण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. प्रसंगी काही गोष्टींचा त्यागही करते. कधी प्रेमाने समाजवतात, तर कधी कठोर बनतात. कधी स्वावलंबी होण्यासाठी काही गोष्टींची जबाबदारी घेण्यास सांगतात तर कधी कठीण काळात ठामपणे पाठीशी उभेही राहतात. जीवनात आधार देणारे, सोबत चालणारे आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे बाबा प्रत्येकासाठीच सुपरहिरो असतात. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील या ‘सुपरहीरो’ला ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न ‘जून’ चित्रपटाच्या टीमने आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने करण्यात आला आहे.

‘जून’ चित्रपटातील ‘बाबा’ गाण्याचं रिप्राईज व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निखिल महाजन यांचे शब्द असलेल्या या गाण्याला शाल्मलीने संगीत दिले आहे तर आनंदी जोशीचा या गाण्याला आवाज लाभला आहे. या गाण्यात नेहा पेंडसे बायस, शाल्मली, आनंदी जोशी, रेशम श्रीवर्धन यांच्यासोबत सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, प्रिया बापट, गिरीजा ओक गोडबोले, मृण्मयी गोडबोले, पर्ण पेठे, गौरा नलावडे, संस्कृती बालगुडे या मैत्रिणींचीही या गाण्याला साथ लाभली आहे.

नेहा पेंडसेने बाबांबद्दल व्यक्त केल्या भावना

‘बाबा’विषयी भावना व्यक्त करताना शाल्मली म्हणते,”आपण अनेकदा वडिलांना द्यायला हवे तितके महत्व देत नाही. मला खूप अभिमान वाटतो, की ‘जून’मधील ‘बाबा’ हे गाणे सोलो फिमेल ट्रॅक असून आनंदी जोशीने खूपच सुंदर गाणं सादर केलं आहे. या गाण्याविषयी आणि आपल्या बाबांविषयी निर्माती, अभिनेत्री नेहा पेंडसे बायस सांगते,”आयुष्यात भरभराट होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते. जसे सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा, तत्त्वे, मूल्ये हे सगळे गुण माझ्या बाबांमुळेच माझ्यात आले. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझ्या बाबांनी या गोष्टी मला कधीच सांगितल्या नाहीत. एकतर ते मितभाषी आहेत. त्यामुळे त्यांच्या कृत्यातून त्या मला समजत गेल्या. मी नेहमीच त्यांना नैतिक मूल्ये जपून आयुष्य भरभराटीला नेताना पाहिलं आहे आणि म्हणूनच ते माझ्यासाठी आदर्श आहेत. मी नक्कीच आईच्या खूप जवळ आहे मात्र मी बाबांसारखी आहे. त्यामुळे ‘बाबा’ या गाण्यातील बोल आमच्या नात्यासाठी अगदी तंतोतंत जुळणारे आहेत.”

बाबांसाठी खास गाण

या गाण्याबद्दल चित्रपटाचे निर्माता आणि गीतकार निखिल महाजन म्हणतात, ” बाबा हे गाणं अशा व्यक्तीवर आहे ज्यांचे आपल्या आयुष्यात विशेष स्थान आहे. आपल्या आयुष्यातील ‘बाबा’ या खास व्यक्तीला हे गाणे ‘जून’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने समर्पित करण्यात येत आहे आणि यासाठी ‘फादर्स डे’पेक्षा चांगला कोणता दिवस असूच शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:25 pm

Web Title: planet marathi and june marathi movie baba song reprise video for fathers day out kpw 89
Next Stories
1 ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा
2 Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी १० दिवसांचा जामीन मंजूर
3 नीति मोहनने शेअर केली मुलगा आर्यवीरची पहिली झलक; क्यूट फोटो पाहून अनुष्का शर्मा म्हणाली…
Just Now!
X