News Flash

प्लास्टिकबंदी: दंडवसुलीवर आधारित ‘कॅरी ऑन! व्हिडिओ’ व्हायरल

प्रशासनाच्या या निर्णयाचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी मात्र 'यावर उपाय काय?' अस विचारलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्लास्टिक बंदीवरुन बहुतांश लोकांना दंड ठोठाविण्यात आला. ज्या व्यक्तींजवळ प्लास्टिकची वस्तू आढळली अशा अनेक व्यक्तींकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या निर्णयाचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी मात्र ‘यावर उपाय काय?’ अस विचारत त्यांना प्रश्न पडला आहे. ५ हजाराचा दंड वसूल करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडिया वर व्हायरल होत आहेत, त्या सोबतच अजून एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे…. तो व्हिडिओ म्हणजे “कॅरी ऑन! व्हिडिओ”

प्लास्टिक पिशवी वर हटके पर्याय म्हणून एक मुलगी आपल्या रोजच्या वापराच्या वस्तुची कशा प्रकारे कॅरी बॅग बनवते आणि भाजी घेते हा व्हिडिओ परत एकदा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील चेहरा ‘रीना अगरवाल’चा आहे हे आपण सगळे जाणतोच, पण या व्हिडिओमुळे रीना अजूनच “फेमस”होत आहे.

‘बेहेन होगी तेरी’, ‘एजंट राघव’ , ‘तलाश’, ‘अजिंठा’ सारख्या बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी रीना आता “३१दिवस” या आगामी मराठी चित्रपटातून २०जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या चित्रपटामध्ये रीनासोबत शशांक केतकर आणि मयुरी देशमुख हे देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. तर आता सर्व प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती ३१दिवस ची!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 11:32 am

Web Title: plastic banned carry on video viral
Next Stories
1 तब्बल 8 जीबी रॅम आणि दमदार फिचर्स , Asus ZenFone 5Z आज होणार लॉन्च
2 FIFA World Cup 2018 : …म्हणून जपान-बेल्जियम सामन्याआधीच ‘त्या’ ऑक्टोपसला जपान्यांनी मारून खाल्ले!
3 फेसबुकला ‘बग’चा फटका, blocked केलेले युजर्स झाले unblocked
Just Now!
X