News Flash

CSKने वाहिली बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली

एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी ७४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं शुक्रवारी निधन झालं. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना ‘लाइफ सपोर्ट सिस्टिम’वर ठेवण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वासह संपूर्ण देशात शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती. त्यानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेंद्रसिंग धोनी नेतृत्व करत असलेल्या CSK संघाने बालसुब्रमण्यम यांच्या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 4:17 pm

Web Title: playback legend sp balasubrahmanyam passes away ms dhoni led csk pays homage vjb 91
Next Stories
1 ‘आज ते सगळं आठवतंय”; लता मंगेशकरांनी वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली
2 एस.पी.बालसुब्रमण्यम यांची सदाबहार गाणी
3 चौकशीच्यावेळी दीपिका सोबत हजर राहण्यासाठी रणवीर सिंगने कोणतीही विनंती केलेली नाही – NCB
Just Now!
X