19 January 2020

News Flash

विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी

मुंबई पोलिसांनी विवेकच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली.

विवेक ओबेरॉय

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील चित्रपट आणि एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर केलेलं वादग्रस्त ट्विट यांमुळे चर्चेत असलेला अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा पुरवली असून धमकी कोणाकडून देण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून विवेकला निनावी फोन येत असून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या धमक्यांनंतर विवेकने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी विवेकच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात केले आहेत.

एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर केलेल्या एका मीममुळे विवेक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा मीम विवेकने पोस्ट केला होता. त्यावरून राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर राज्य व केंद्रीय महिला आयोगानं नोटीसही पाठवली आहे. सर्वच स्तरांतून होणाऱ्या टीकांच्या पार्श्वभूमीवर विवेकने तो ट्विट डिलीट करत माफी मागितली.

विवेकचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपटसुद्धा चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर २४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विवेक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे.

First Published on May 23, 2019 9:40 am

Web Title: pm narendra modi star vivek oberoi receives death threat
Next Stories
1 ‘ही’आहे माधुरीची सुप्त इच्छा
2 स्माईल फाउंडेशनच्या कार्यक्रमातून विवेक ओबेरॉयला वगळले
3 सलमान म्हणतोय,”आलिया माझ्यापेक्षा जास्त प्रतिभावंत कलाकार”
Just Now!
X