News Flash

‘तुम्ही उत्तम पालक व्हाल..’; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट

वाचा मोदींचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ७०वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यात कलाविश्वातील अनेक मंडळीसुद्धा होती. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अनुष्का शर्मा, सोनू सूद, हृतिक रोशन यांनी ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या. मोदींनी अनेकांच्या शुभेच्छांना उत्तरसुद्धा दिलं.

क्रिकेटर विराट कोहलीने दिलेल्या शुभेच्छांवर मोदी म्हणाले, ‘धन्यवाद विराट. तुला आणि अनुष्का शर्मालाही मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुम्ही उत्तम पालक व्हाल अशी मला खात्री आहे.’ अनुष्का गरोदर असून काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांनी ही गोड बातमी सांगितली होती. विराट आणि अनुष्का लवकरच आई-बाबा होणार असून त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे.

करण जोहरच्या ट्विटला मोदींचं उत्तर- 

आणखी वाचा : “एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा”; कंगनाला सल्ला

‘चित्रपटांविषयी असलेलं प्रेम आणि आपल्या चित्रपटांचा जागतिक स्तरावरील प्रभाव यांबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायला मिळाली हे माझं भाग्य आहे’, असं म्हणत करण जोहरने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर ‘चित्रपटांबद्दलची तुझी आवड खूप चांगली आहे’, असं म्हणत मोदींनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:45 pm

Web Title: pm narendra modi tells virat kohli anushka sharma you will be amazing parents ssv 92
Next Stories
1 …त्यावेळी का गप्प होतात?; जया प्रदा यांचा जया बच्चन यांना सवाल
2 “उर्मिला सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री नाही”; कंगनावर राम गोपाल वर्मा संतापले
3 Birthday Special : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविषयी काही खास गोष्टी
Just Now!
X