25 January 2021

News Flash

‘मोगली’नंतर बच्चे कंपनीसाठी दूरदर्शनवर येतोय ‘छोटा भीम’

किती वाजता पाहता येईल छोटा भीम?

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाची चैन तोडण्यासाठी सरकारने लॉकाडाउन जारी केला. या लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘ऑफिस ऑफिस’ असे अनेक गाजलेले कार्यक्रम पुन्हा एकदा सरु करण्यात आले. या यादीत आता आणखी एका क्रायक्रमाची भर पडली आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आता ‘छोटा भीम’ ही कार्टून मालिका देखील दूरदर्शन वाहिनीवर दाखवली जाणार आहे.

दूरदर्शन वाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडरवरुन याबाबत माहिती देण्यात आली. दररोज दुपारी २ वाजता ‘छोटा भीम’ ही कार्टून मालिका दूरदर्शनवर प्रसारीत केली जाईल. हे कार्टून पोगो वाहिनीवर सुद्धा दाखवले जाते. यापूर्वी ‘जंगल बुक’ हे कार्टून सुरु करण्यात आले होते.

९०च्या दशकात सुपरहिट ठरलेल्या या मालिकांची लोकप्रियता आजही कायम आहे. या कार्यक्रमांमुळे दूरदर्शन वाहिनी आता पुन्हा एकदा सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये क्रमांक एकवर पोहोचली आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल अर्थात BARC या संस्थेने एक अहवाह जाहीर केला आहे. या अहवालानुसार गेल्या दोन आठवड्यात दूरदर्शनच्या प्रेक्षकांमध्ये प्रती दिवस सरासरी ४० हजारांची वाढ होत आहे. सध्या देशात ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘शक्तिमान’ या तीन मालिका सर्वाधिक पाहिल्या जात आहेत. या व्यतिरिक्त ‘ब्योमकेश बक्षी’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’, ‘बुनियाद’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिका देखील मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जात आहेत. ९०च्या दशकातील या सुपरहिट मालिकांमुळे दूरदर्शनचे सुवर्णयुग पुन्हा एकदा परतल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियाव्दारे देशभरातील प्रेक्षक देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 6:42 pm

Web Title: pogo collaborates with dd to simulcast chhota bheem mppg 94
Next Stories
1 VIDEO : लॉकडाउनमध्ये राजकुमार राव कापतोय प्रेयसीचे केस
2 फराह खानला डॉक्टरांनी दिला क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला; जाणून घ्या कारण…
3 लॉकडाउनच्या काळात सेहवाग पाहतोय ‘ही’ पौराणिक मालिका
Just Now!
X