22 September 2020

News Flash

कंगनाची बहिण अडचणीत; आधी झाले अकाउंट सस्पेंड अन् आता पोलीस तक्रार

रंगोली विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद (सस्पेंड) करण्यात आले आहे. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र रंगोलीच्या समस्या अद्याप थांबलेल्या नाहीत. आता तिच्याविरोधात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अली कासिफ खान यांनी अंबोल पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. रंगोली चंडेल सोशल मीडियावर व्देश पसरवण्याचं काम करते. प्रसिद्धीसाठी ती ठराविक समुदायाच्या लोकांना टारगेट करते. देश करोनासारख्या प्राणघातक विषाणूच्या संकटात असताना तिने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम अद्याप थांबवलेले नाही. त्यामुळे ही पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असे अली कासिफ खान म्हणाले.

यापूर्वी अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने देखील रंगोलीवर टीका केली होती. “रगोलीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी धन्यवाद ट्विटर. ती काही ठराविक समुदायांना लक्ष करत होती. त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत होती.” अशा आशयाचे ट्विट करुन फराह खानने रंगोलीवर निशाणा साधला होता.

रंगोली आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरद्वारे ती अनेकदा इतरांवर आरोप-प्रत्यारोप, टिकाटिप्पणी करताना दिसते. मात्र ते करताना ट्विटरच्या नियमांकडे तिने दुर्लक्ष केलं. गेल्या काही दिवसांपासून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने चर्चेत होती. ‘महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे’,असं म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर रंगोली व कंगना रणौत या दोघींची नावं ट्रेण्ड होत आहेत. काहींनी रंगोलीला पाठिंबा देत तिची काय चूक आहे, असा प्रश्न विचारला तर काहींनी तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 4:59 pm

Web Title: police complaint filed against kangana ranauts sister rangoli chandel mppg 94
Next Stories
1 बबिता फोगटला केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी – कंगना रणौत
2 रवी जाधवच्या मुलाला मिळालं सरप्राइज; जीवनदान देणाऱ्या व्यक्तीशी अशी झाली भेट
3 पंतप्रधान-गृहमंत्र्यांना अतिरेकी म्हटलेलं चालतं, पण…; रंगोलीच्या समर्थनार्थ कंगना मैदानात
Just Now!
X