पाकिस्तानच्या सेंन्सॉर बोर्डाने संजय दत्तचा चित्रपट ‘पोलिसगिरी’ आणि अमेरिकी चित्रपट ‘मॅन ऑफ स्टील’ यांच्या प्रदर्शनावर आज (शुक्रवारी) बंदी घातली आहे. परंतु, यामागचे कोणतेही विशेष कारण अद्याप कळलेले नाही. ‘मोशन पिक्चर्स ऑर्डिनेन्स-१९७९’ चे हे दोनही चित्रपट उल्लंघन करत असल्यामुळे यांच्यावर बंदी आणल्याचे सेन्सॉर बोर्डाने जाहीर केलेल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे. हे चित्रपट काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित झाले असून, कराची आणि लाहोरमधील काही ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन चालू आहे.
संजय दत्तने तुरुंगात जाण्यापूर्वी पूर्ण केलेला ‘पोलिसगिरी’ तमिळ चित्रपट ‘सामी’चा रिमेक आहे. के.एस.रविकुमार दिग्दर्शित हा चित्रपट भारतात ५ जुलैला प्रदर्शित झाला होता. ‘मॅन ऑफ स्टील’ हा अमेरिकी सुपरहिरो ‘सुपरमॅन’चा सिक्वल असून, याचे दिग्दर्शन जॅक सिंडरने केले आहे.