News Flash

अर्ध सलांबा सिरसासन करत अभिनेत्री पुजा बत्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिन

वयाच्या ४४ व्या वर्षीही स्वतःला तंदुरुस्त ठेवलं. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय.

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात येतोय. भारतात देखील मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा केला गेला. पण यावेळी काही जणांनी विशिष्ट पद्धतीने योगा केला. यापैकी एक नाव म्हणजे पुजा बत्रा. अभिनेत्री पूजा बत्रा आपल्या योगाने आपल्या दिवसाची सुरुवात करते. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि दररोज आपले योगा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अभिनेत्री पुजा बत्राने नवा व्हिडीओ शेअर केलाय. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये खूपच चर्चेत आलाय.

अभिनेत्री पुजा बत्रा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पुजा बत्रा अर्ध सलांबा सिरसासन करताना दिसून आली. हा वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना तिने बीकेएस अयंगर यांचं एक वाक्य कॅप्शनमध्ये लिहिलंय. यात तिने लिहिलंय, “योगा एक असा प्रकाश आहे जो एकदा पेटवला की कधीच मंदावत नाही. तुमचा सराव जितका जास्त असेल तितकं तेज जास्त दिसेल.” यासोबतच तिने #happyinternationalyogaday #yogawithpoojabatra #tripodheadstand असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra)

या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने “वंडरफुल ट्रान्सफॉर्मेशन” अशी कमेंट केली, तर दुसर्‍या युजरने लिहिलं की, “वयाच्या ४४ व्या वर्षीही तुम्ही खूप तंदुरुस्त आणि सुंदर दिसता”, या व्यतिरिक्त इतर युजरनी हार्ट इमोटिकॉन पोस्ट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. वयाच्या 44 व्या वर्षीही या अभिनेत्रीने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे.

अभिनेत्री पुजा बत्राच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, पूजा ने ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू एस आहलूवालिया यांच्यासोबत २००२ मध्ये कॅलिफॉर्नियाच्या लॉस एंजेलेसमध्ये लग्न केलं होतं. पण त्यानंतर २०११ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पुजाने ४ जुलै २०१९ मध्ये अभिनेता नवाब शाहसोबत दिल्लीतल्या आर्य समाज रितीनुसार विवाह केला.

पूजाने 2012मध्ये तामिळ चित्रपट ‘मुगामुडी’द्वारे मोठ्या पडद्यावर आगमन केले. पूजाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले.2016मध्ये आशुतोष गोवारीकरांच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेता हृतिक रोशनसह पूजाने या चित्रपटात आपला अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नव्हता.आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीने एका जाहिरातीत पूजाला पाहिले होते आणि पुढच्या चित्रपटात पूजाला कास्ट करण्याचे सुचवले होते. ‘मोहेंजो दारो’ चित्रपटानंतर पूजा हेगडे ‘हाऊसफुल 4’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 4:40 pm

Web Title: pooja batra celebrates international yoga day 2021 by doing tripod headstand prp 93
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा
2 ‘एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य’, समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित
3 लॉकडाउननंतर पहिल्यांदा रणवीरने केली चित्रीकरणाला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल!
Just Now!
X