20 September 2020

News Flash

नवाबसाठी पूजा ठरली लकी, मिळाली या चित्रपटात झळकण्याची संधी

नवाब या चित्रपटात एका व्यापाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘विरासत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बत्राने नुकतेच लग्न केले आहे. पूजाचं हे दुसरं लग्न आहे. लॉस अँजेलीस येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ सोनू अहलुवालियासोबत २००३ मध्ये तिचं लग्न झालं होतं. पण २०११ रोजी तिचा घटस्फोट झाला होता. आता आपला प्रियकर नवाब शाहसोबत पूजा बत्राने लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी पारंपारिक पद्धतीने विवाह केल्याची माहिती आहे.

कोणताही गाजावाजा न करता त्यांनी लग्न केलं आहे. पूजाने इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या फोटोंवरून त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. लग्नानंतर लगेच नवाबला एका मोठ्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. नवाबला रजनीकांच्या ‘दरबार’ चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीसुद्धा दिसणार आहे. नवाब या चित्रपटात एका व्यापाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

Man Crush Everyday @nawwabshah

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

नवाब शाहने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाग मिल्खा भाग, दिलवाले, डॉन, टायगर जिंदा है चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. याशिवाय नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या तो ‘पानिपत’ आणि ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 4:57 pm

Web Title: pooja batra nawab shah new film djj 97
Next Stories
1 Web Series : सायली संजीव, ओमप्रकाश शिंदे घेणार प्रेमाचा ‘यू टर्न’
2 जॉन अब्राहम घेऊन येतोय एक नवा थरारपट
3 कोण आहेत दत्तगुरुंचे पहिले गुरु?
Just Now!
X