News Flash

“हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

वाढीव वीज बिलांमुळे सेलिब्रिटी देखील त्रस्त

सर्वसामान्य लोकांसोबतच आता सेलिब्रिटी देखील वीज बिल जास्त आल्यामुळे त्रस्त झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्री तापसी पन्नू आणि रेणुका शहाणे यांनी वीज बिल जास्त आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता पूजा बेदी देखील वाढीव वीज बिलामुळे वैतागली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या महिन्यात वीज बिल कमी आल्यामुळे तिने आनंद व्यक्त केला होता. मात्र यावेळी वीज कंपनीने तिला अधिक बिल पाठवून तिच्या आनंदावर विरजण पाडलं आहे.

अवश्य पाहा – १२वीत कमी मार्क मिळाल्यामुळे अभिनेत्री नाराज; ‘या’ कारणामुळे झाला नव्हता अभ्यास

“मी उगाचच आनंद व्यक्त केला होता. या महिन्यात माझं विजेचं बील आठ हजारांवरुन थेट ३२२५० रुपयांवर पोहोचलं आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये नसताना मला इतकं बिल आलं आहे. हे कल्पनेच्या पलिकडलं आहे.” अशा आशयाचं ट्विट अभिनेत्री पूजा बेदी हिने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

अवश्य पाहा – खरा सुपरहिरो! ‘या’ सहा वर्षांच्या मुलाला मार्व्हलने दिली ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड

राज्यातील अंदाजे २ कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांच्या वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत, या कारणांबाबत वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

“वीज बिलं वाढण्याचे पहिले कारण नैसर्गिक आहे. मार्च ते जून हा पूर्णपणे उन्हाळ्याचा कालावधी असल्याने तसेच या काळात लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्वजण घरात बसून होते. त्यामुळे या काळात सर्व खोल्यांमधील दिवे, पंखे, टीव्ही, कॉम्प्युटर सुरू राहिल्याने वीज वापर वाढला आहे. दुसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे १ एप्रिल २०२० पासून झालेली वीजेची दरवाढ. १ एप्रिलनंतर हे पहिलेच बिल आहे आणि आता आलेल्या बिलांतील अडीच महिने हे जादा वीज दराचे आहेत. ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण दरवाढ माहीतीच नसल्याने बिले चुकीची आली आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात असंतोष, राग व नाराजी प्रकट करायला हवी,” अशी माहिती वीजतज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी येथे गुरुवारी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 3:31 pm

Web Title: pooja bedi complaint of electricity bill mppg 94
Next Stories
1 सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची गरज नाही : गृहमंत्री देशमुख
2 “…तर देशात शांती टिकणार नाही”; उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर संतापली कंगना रनौत
3 “माझ्यावर झालेल्या बलात्काराची कथा अभिनेत्रीने स्वत:च्या नावाने खपवली”
Just Now!
X