07 March 2021

News Flash

नागा साधूंना अटक झाली पाहिजे म्हणणाऱ्या पूजा बेदीला कुंभमेळ्याचं आमंत्रण

मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोची तुलना नागा साधूंसोबत केल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेने तीव्र निषेध नोंदवला आहे.

पूजा बेदी

अभिनेता मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोची तुलना नागा साधूंसोबत केल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेने तीव्र निषेध नोंदवला आहे. पूजा बेदीच्या विधानाबाबत संताप व्यक्त करत या परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, “नागा परंपरेबाबत पूजा बेदी यांना कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी हरिद्वार येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याला आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत. तिथे आल्यावर त्यांना नागा साधूंबाबत आणि नागा परंपरेबाबत थोडंफार तरी ज्ञान मिळेल.”

मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणने सोशल मीडियावर त्याचा न्यूड फोटो पोस्ट केला होता. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर पळतानाचा हा फोटो होता. त्या फोटोवर अनेकांनी टीका केली. इतकंच नव्हे तर मिलिंदविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली. मात्र पूजा बेदीने मिलिंदची पाठराखण केली.

मिलिंदच्या समर्थनार्थ ट्विट करत पूजाने लिहिलं, ‘मिलिंदच्या फोटोमध्ये काहीही अश्लिल नाही. तो फोटो पाहून कल्पना करणाऱ्यांच्या डोक्यात अश्लिलता भरली आहे. त्याचा अपराध चांगलं दिसणं, प्रसिद्ध होणं आणि बेंचमार्क प्रस्थापित करणं आहे. जर नग्नता हा अपराध असेल तर नागा साधूंना देखील अटक झाली पाहिजे. ते केवळ शरीरावर राख लावतात म्हणून त्यांच्या नग्नतेचा स्विकार नाही करु शकत.’

आणखी वाचा- ‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा

पूजाच्या या ट्विटबद्दल महंत गिरी म्हणाले, “नागा साधूंची एक परंपरा आहे. त्याची तुलना एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्याच्या नग्नतेशी करणं, अश्लिलतेशी करणं अत्यंत चुकीचं आहे. पूजा यांनी कुंभमेळ्यात काही वेळ घालवावा. तिथे त्यांना नागा साधूंच्या कठीण तपश्चर्येची प्रचिती येईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 10:55 am

Web Title: pooja bedi invited to next kumbh by mahant giri ssv 92
Next Stories
1 अविका गौरने दिली प्रेमाची कबुली; करते ‘या’ व्यक्तीला डेट
2 KBC 12 : यंदाच्या पर्वात पहिल्या करोडपती होणाऱ्या कोण आहेत नाजिया नसीम ?
3 KBC मध्ये सात कोटींसाठी विचारला सुभाषचंद्र बोसांवरील ‘हा’ प्रश्न, स्पर्धकाला नाही आलं उत्तर
Just Now!
X