13 August 2020

News Flash

“टीकेमुळे मी विचलित होत नाही”; पूजा भट्टने ट्रोलर्सवर साधला निशाणा

पूजा भट्टचा थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती नेहमीच प्रतिक्रिया देत असते. मात्र काही वेळा या प्रतिक्रियांमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ देखील येते. मात्र हे टीकाकार तिला कुठल्याही प्रकारे विचलित करु शकत नाही असं पूजाला वाटतं.

अवश्य पाहा – “जय जय महाराष्ट्र माझा”; पूजा भट्टनं केलं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं कौतुक

पूजा भट्टने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये ती बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. या फोटोमार्फत तिने आपल्या टीकाकारांना उपरोधिक टोला लगावला आहे. “टीकाकार मला विचलित करु शकत नाहीत. ९०च्या दशकापासून मी टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.” अशा आशयाची कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. पूजाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘ऑस्कर’मध्येही घराणेशाही? हृतिक आणि आलियाला अ‍ॅकेडमी अवॉर्डचे आमंत्रण

 

View this post on Instagram

 

Criticism? Doesn’t faze me! I’ve been in hot water since the early 90’s #SumeetChopra

A post shared by Pooja B (@poojab1972) on

पूजा भट्ट ९०च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. तिने ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘जुनून’, ‘अंगारे’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वाढत्या वयामुळे पूजाने अभिनयाला रामराम ठोकला. मात्र दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून ती अद्याप बॉलिवूडमध्ये काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 10:56 am

Web Title: pooja bhatt bathtub throwback photo shares mppg 94
Next Stories
1 मी देखील घराणेशाहीचा शिकार – सैफ अली खान
2 सुशांतच्या आत्महत्येपूर्वी ‘ही’ व्यक्ती घरातच होती?
3 आत्महत्येपूर्वी सुशांतने केलं होतं ‘हे’ गुगल सर्च ?
Just Now!
X