News Flash

“जय जय महाराष्ट्र माझा”; पूजा भट्टनं केलं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं कौतुक

लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय

“जय जय महाराष्ट्र माझा”; पूजा भट्टनं केलं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं कौतुक

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता ‘आरोग्यत्सव’ साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे अभिनेत्री पूजा भट्ट हिने कौतुक केले आहे. हा अत्यंत प्रेरणादायी निर्णय असल्याचं तिने म्हटलं आहे.

“खरंच हा एक कौतुकास्पद निर्णय आहे. तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल. आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेत अशी मदत करायला हवी. जय जय महाराष्ट्र माझा.” अशा आशयाचे ट्विट करुन पूजाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवणार आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. करोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून करोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या काळामध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रक्तदान आणि प्लाझमा थेरपी उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 5:25 pm

Web Title: pooja bhatt praises lalbaughcha raja mandals decision mppg 94
Next Stories
1 आषाढी एकादशीनिमित्त कीर्तनकारांशी लाइव्ह संवाद साधण्याची संधी
2 अभिनेत्रीला लागलं ल्युडोचं वेड; चाहत्यांसोबत ऑनलाइन बसली खेळत
3 Video : उद्धव ठाकरे यांच्या ‘एरियल फोटोग्राफी’तून साकार झालं ‘विठ्ठला’
Just Now!
X