22 January 2021

News Flash

पुरस्कार सोहळ्यातील ‘तो’ व्हिडीओ शेअर करत पूजा भट्टने केला कंगनावर पलटवार

कंगना रणौत व पूजा भट्ट यांच्यातील शाब्दिक चकमकीने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौत व पूजा भट्ट यांच्यातील शाब्दिक चकमकीने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून या दोघींमध्ये ट्विटरवॉर रंगलंय. आता पूजाने कंगनाचा जुना व्हिडीओ शेअर करत तिच्यावर पलटवार केला आहे. हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील असून यामध्ये कंगना मुकेश भट्ट व महेश भट्ट यांचे आभार मानताना दिसतेय.

२००६ मधील फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. या पुरस्कार सोहळ्यात कंगनाला ‘गँगस्टर’ या चित्रपटासाठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्सअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली होती. पुरस्कार स्वीकारताना कंगनाने या दोघांचे आभार मानले आणि त्यापूर्वी तिने मुकेश भट्ट यांना मिठीदेखील मारली.

‘हा व्हिडीओसुद्धा खोटा असू शकतो का? लढण्यासाठी दोघांची गरज असते. पण मी आरोप व प्रत्यारोपाच्या या गोष्टी इतरांवर सोडून देतेय. त्यापेक्षा मी जे सत्य आहे ते मांडेन’, असं खोचक ट्विट पूजाने केलं आहे.

काय आहे पूजा भट्ट व कंगना रणौतमधील वाद?

भट्ट कुटुंबीयांनीच कंगनाला लाँच केलं असं ट्विट करत पूजा भट्टने घराणेशाहीच्या मुद्द्यावर ट्विट केलं. या ट्विटनंतर कंगनानेही तिला उत्तर दिलं.

काय होतं पूजा भट्टचं ट्विट?

‘घराणेशाही हा सध्याचा ज्वलंत विषय आहे आणि या विषयावर मला बोलण्यास सांगितलंय. ज्या कुटुंबाने नेहमीच नव्या कलाकारांना, तंत्रज्ञांना, संगीतकारांना संधी दिली त्या कुटुंबातील व्यक्तीला घराणेशाहीबद्दल बोलायला सांगत आहेत. मी यावर फक्त हसू शकते. लोकांना सत्य स्वीकारायचं नसतं पण त्याउलट काल्पनिक गोष्टींवर त्यांचा लगेच विश्वास बसतो. कंगना खूप चांगली अभिनेत्री आहे. जर तिच्यात प्रतिभा नसती तर विशेष फिल्म्स बॅनरअंतर्गत गँगस्टर चित्रपटातून तिला लाँच केलं नसतं. अनुराग बासूने तिला शोधलं. पण विशेष फिल्म्सने तिला लाँच केलं. ही काही छोटी गोष्टी नाही.’

काय होतं कंगनाचं उत्तर?

‘कंगनाची प्रतिभा अनुराग बासू यांनी ओळखली आणि प्रत्येकाला हे माहित आहे की मुकेश भट्ट यांना कलाकारांना पैसे द्यायला आवडत नाही. प्रतिभावान कलाकारांना मोफत उपलब्ध करून देण्याचे उपकार अनेक स्टुडिओ त्यांच्यावर करतात. त्यामुळे तिच्यावर चप्पल भिरकावण्याचा, तिला वेडी म्हणण्याचा आणि तिचा अपमान करण्याचा अधिकार तुझ्या वडिलांकडे नाही. दु:खद शेवट अशा शब्दांत त्यांनी तिला हिणवलं. त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि रिया यांच्या नात्यात इतकं लक्ष का दिलं? त्यांनी त्याच्याही शेवटावर का वक्तव्य केलं यांसारखे काही प्रश्न तू त्यांना जाऊन विचार. कंगनाने गँगस्टरसोबतच पोकिरी या चित्रपटासाठीही ऑडिशन दिलं होतं आणि त्यासाठीही तिची निवड झाली होती. पोकिरीसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता आणि तुला वाटतंय की ती आज जे काही आहे ते गँगस्टर चित्रपटामुळे आहे. पाण्याचा प्रवाह कोणीच रोखू शकत नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:29 pm

Web Title: pooja bhatt shares video of kangana ranaut thanking mahesh bhatt at award ceremony ssv 92
Next Stories
1 …जेव्हा सुझानसाठी संपूर्ण सलून रिकामं करावं लागतं
2 जॅकी श्रॉफची सामाजिक बांधिलकी; गरजुंसाठी दिला मदतीचा हात
3 चिमुकलीच्या तोंडून ‘बाला’ हे गाणे ऐकताच अक्षय कुमार म्हणाला…
Just Now!
X