News Flash

करोनाची चाचणी करण्यासाठी अभिनेत्रीनं सलमानकडे मागितले पैसै

अभिनेत्रीमध्ये दिसतायत करोनाची लक्षणं

करोना विषाणूने सध्या संपूर्ण देशात थैमान घातले आहे. लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही करोनाचे संक्रमण अद्याप थांबलेले नाही. सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत हजारो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचे नाव जोडले जात आहे. सलमान खानसोबत ‘वीरगती’ या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री पूजा डडवालच्या शरीरात करोना विषाणूची लक्षण दिसत आहेत. परिणामी तिने सलमानकडे मदतीची याचना केली आहे.

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूजाने आपल्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली. कधीकाळी चमचमत्या रुपेरी दुनियेत वावरणारी पूजा आज एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत आहे. ती म्हणाली, “गेल्या सात दिवसांपासून मला ताप येत आहे. तसंच खोकल्याचा त्रासही जाणवतोय. माझ्या शरीरात करोनाची लक्षण दिसत आहेत. पण माझ्याकडे करोना चाचणी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. आता सलमान खानच माझी शेवटची आशा आहे. यापूर्वीही त्याने मला मदत केली होती. आता पुन्हा एकदा त्याने मला मदत करावी ही विनंती.” या विनंतीवर सलमान खानने आद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

देशात रुग्णसंख्या ३ लाखांहून अधिक

देशात करोना रुग्णांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ इतकी झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक नव्या रुग्णांची भर पडली असून शुक्रवारी दिवसभरात ११ हजार ४५८ रुग्ण आढळले. दिल्लीतही चोवीस तासांमध्ये आणखी २ हजार रुग्ण वाढले. भारत आता करोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही करोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये करोना रुग्णांचे मृत्यू ३८६ झाले असून सलग तिसऱ्या दिवशी तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यू ८ हजार ८८४ झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 4:32 pm

Web Title: pooja dadwal asks for help salman khan as she fears coronavirus symptoms mppg 94
Next Stories
1 Lockdown : ‘आईच्या त्या प्रश्नांची किंमत कळते’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला बालपणीचा फोटो
2 “सुशांतच्या मृत्यूमागे मोठा कट”; न्यायालयीन चौकशी करण्याची भाजपा खासदाराची मागणी
3 Video : सुशांतच्या आत्महत्येमुळे भावूक झालेल्या अंकिताने घेतली कुटुंबीयांची भेट
Just Now!
X