25 February 2021

News Flash

पूजा हेगडेचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; रात्री एक वाजता केला असा मॅसेज

अकाउंट हॅक झाल्यामुळे पूजा हेगडे होती त्रस्त

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे हिचं इन्स्टाग्राम अकाउंट काही अज्ञान हॅकर्सनी हॅक केलं होतं. अकाउंट हॅक झाल्याचं लक्षात येताच पूजाने आपल्या टेक्निकल टीमशी संपर्क साधला. थोड्याच वेळात त्यांनी तिचं अकाउंट पूर्ववत करुन दिलं. पूजाने बुधवारी रात्री साडे बारा वाजता ट्विट करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

“मित्रांनो, माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. माझी डिजीटल टीम हे अकाउंट पूर्ववत करण्यासाठी माझी मदत करत आहे. दरम्यान तुम्ही माझ्या अकाउंटवरुन आलेलं कुठल्या प्रकारचं आमंत्रण स्विकारु नका. तसेच स्वत:ची वैयक्तिक माहिती देखील देऊ नका.” अशा आशयाचे ट्विट पूजा केले होते.

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट करुन अकाउंट पूर्ववत झाल्याची माहिती दिली. “गेल्या तासभरापासून मी चिंतेत होते. परंतु टेक्निकल टीममुळे माझी काळजी मिटली आहे. अखेर माझं इन्स्टाग्राम अकाउंट पूर्ववत झालं. गेल्या तासभरात या अकाउंटवरुन जे काही पोस्ट करण्यात आलं, ते सर्व मी डिलीट केलं आहे.” अशा आशयाचं ट्विट पूजाने केलं. गेल्या काही काळात हॅकिंगच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अलिकडेच अमेरिकेत एक सायबर अटॅक करण्यात आला होता. यामध्ये प्रियांका चोप्रासह अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांचे अकाउंट हॅक केले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 5:01 pm

Web Title: pooja hegde after instagram account gets hacked mppg 94
Next Stories
1 Video : प्रशांत दामलेंसोबत रंगली गप्पांची संध्याकाळ
2 “२० लाख कोटींच पॅकेज ‘बबुष्का बाहुली’सारखं”; फराह खानने सरकारवर साधला निशाणा
3 ‘शाळेत असताना या किटकांना मारण्यासाठी आम्हा विद्यार्थांना बोलवायचे’ – धर्मेंद्र
Just Now!
X