News Flash

आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीला करोनाची लागण, पोस्ट शेअर करत म्हणाली…

म्हणाली, '' मी विनंती करते....''

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेक बॉलिवूड कलाकारांना बसला आहे. गेल्या काही दिवसांत सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना एकमागोमाग एक करोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. बॉलिवूड आणि साऊथची ब्यूटी क्विन अभिनेत्री पूजा हेगडे ही देखील कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. ट्विट शेअर करून पूजाने ही माहिती दिलीय.

टि्वटमध्ये लिहीताना ती म्हणाली, ”हॅलो, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छित आहे की माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलेली आहे. सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत मी स्वतःला आयसोलेट करून घेतलंय. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मी सर्वांना विनंती करते की जे जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, तुमचं सहकार्य आणि प्रेमाबद्दल खूप खूप आभार…मी सध्या बरी होण्यासाठी प्रयत्न करतेय, घरी रहा, सुरक्षित रहा आणि काळजी घ्या”,

पूजा हेगडेच्या या ट्विटनंतर सोशल मिडीयावर #PoojaHegde हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. तिच्या ट्विटवर कमेंट करत तिचे फॅन्स आणि इतर सेलिब्रीटी हे ती बरी होण्यासाठी प्रार्थना करताना दिसून येत आहेत.

राम चरणसोबत केली होती गाण्याची शुटींग
पूजा हेगडे हिने काही दिवसांपूर्वीच तेलगू सिनेमाचे मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा अभिनेता राम चरण यांच्यासोबत एका गाण्याची शुटींग केली होती. आगामी फिल्म ‘आचार्य’ मधल्या या गाण्याची शुटींग होती. राजमुंदरी इथे ‘आचार्य’ फिल्मचा मोठा सेट देखील उभारला गेलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 3:31 pm

Web Title: pooja hegde tested covid positive actess isolates herself at home in mumbai prp 93
Next Stories
1 श्रवण यांच्या निधनानंतर नदीम यांची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण
2 Oscar 2021: ऑस्कर विजेत्याने मानले पालकांचे आभार, कारण वाचाल तर हैराण व्हाल
3 “…या कारणांमुळे एका आठवड्यातच मी केली कोरोनावर मात !”
Just Now!
X