बिग बॉसची माजी स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्राने अभिनेत्री सनी लिऑनी विरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. तसेच तिच्याकडून नुकसान भरपाई म्हणून पूजाने १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
बिग बॉस पाचव्या पर्वामध्ये पूजा मिश्रा सहभागी झाली होती. त्याच पर्वात सनीला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. माझ्या लोकप्रियतेमुळे सनीच्या मनात माझ्याविषयी द्वेष आणि मत्सर होता. याचमुळे तिने काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलखतीतून माझी बदनामी केली. त्यामुळे माझे ७० लाखांचे नुकसानही झाले, असा आरोप पूजाने केला आहे.
आयपीसीच्या ५०० (बदनामी) आणि १२० बी (कट रचणे) या कलमातंर्गत सनी विरोधात कारवाई सुरु करावी अशी पूजाने मागणी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 5, 2016 10:46 am