‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमातून सोनी मराठी वाहिनी नृत्य कलाकारांसाठी एक नवीन संधी घेऊन आली आहे. या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत धर्मेश सर आणि पूजा सावंत. नृत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे ‘धर्मेश सर’. तर सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे पूजा सावंत. फार कमी लोकांना माहित असेल की, बुगी वुगी या प्रसिद्ध कार्यक्रमात २००८ साली पूजा सावंत आणि धर्मेश सर यांनी भाग घेतला होता.

धर्मेश सर त्या पर्वाचा विजेता ठरला होता. पूजा आणि धर्मेश सर यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात एकत्र केली. बुगी वुगीच्या टॉप ५ मध्ये पूजा आणि धर्मेश सर दोघंही होते. आज दोघंही यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. या रिअॅलिटी शोच्या काही मजेशीर आठवणी दोघांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या या खास मुलाखतीत सांगितल्या.

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Shiv Sena Shinde campaign song
Video: ‘बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने सुरुवात, उबाठावर टीका, मोदींचे आवाहन’, शिंदे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम ३० नोव्हेंबरपासून सोमवारी व मंगळवारी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.