27 February 2021

News Flash

पूजा सावंतच्या बोल्ड लूकवर सेलिब्रिटीही फिदा

अमृता खानविलकर, सुयश टिळक, सई मांजरेकर अशा बऱ्याच कलाकारांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले काही फोटो. पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील पूजाच्या बोल्ड लूकवर सेलिब्रिटीसुद्धा फिदा झाले आहेत. अमृता खानविलकर, सुयश टिळक, सई मांजरेकर, सुखदा खांडकेकर, हेमल इंगळे अशा बऱ्याच कलाकारांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने पूजाचा हा फोटोशूट केला आहे. पूजा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. याआधीही तिने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत एक फोटोशूट केला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर दागिन्यांच्या जाहिरातीसाठी हा फोटोशूट केला होता. त्या फोटोवरूनही बऱ्याच मराठी कलाकारांनी पूजाचं कौतुक केलं होतं.

पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या.’आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 7:41 pm

Web Title: pooja sawant bold and hot look getting attention from celebrities ssv 92
Next Stories
1 ‘ती मुलगी माझी नाही’; अनुराधा पौडवाल यांनी फेटाळला दावा
2 कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीची धक्कादायक प्रतिक्रिया
3 हार्दिकच्या साखरपुड्याच्या फोटोवर एक्स गर्लफ्रेंडने केली कमेंट
Just Now!
X