30 October 2020

News Flash

पूजा सावंतचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

मराठी कलाकारांचा बोल्ड अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

पूजा सावंत

बॉलिवूड अभिनेत्रींना आपण नेहमीच बोल्ड अंदाजात पाहिलंय. आता बॉलिवूड कलाकारांच्या तोडीस तोड अशा मराठी अभिनेत्री बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीपासून पूजा सावंतपर्यंत बऱ्याच मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट पोस्ट करताना दिसत आहेत. नुकतंच पूजा सावंतच्या एका फोटोशूटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

पूजाने प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबत काही फोटोशूट केले आहेत. या सर्व बोल्ड फोटोंची मालिकाच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ट्रान्सपरंट टॉपमध्ये पूजाने हे फोटोशूट केले आहे.

आणखी वाचा : ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’; प्राजक्ता माळीवर नेटकरी नाराज

पूजासोबतच प्राजक्ता माळीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले होते. तर प्रेक्षकांमध्ये ‘शनाया’ या नावाने चर्चेत असलेली अभिनेत्री रसिका सुनील हिनेसुद्धा मोनॉकिनी आणि बिकिनीमधले काही फोटो पोस्ट केले आहेत.

एकंदरीत मराठी कलाकारांचा बोल्ड अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 7:14 pm

Web Title: pooja sawant bold photo shoot in transparent top getting attention on social media ssv 92
Next Stories
1 मोहन जोशी छोट्या पडद्यावर; राजश्री प्रॉडक्शनसोबत पहिल्यांदाच करणार काम
2 सई मांजरेकरचा अस्सल मराठमोळा लूक; सेलिब्रिटींनाही घातली भुरळ
3 आदित्य आणि नेहाच्या लग्नामुळे उदीत नारायण यांना होणार हा फायदा?
Just Now!
X