News Flash

“..म्हणून आई पूनम ढिल्लोंच्या रोमॅंटीक फिल्म नाही बघत !” ; मुलगा अनमोल ढिल्लोंने सांगितलं हे कारण

अभिनेत्री पुनम ढिल्लों यांचा मुलगा आहे अनमोल ठकेरिया ढिल्लों

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी अनेक महत्त्वाच्या आणि यशस्वी चित्रपटात काम केलंय. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासह धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र कपूर, ऋषि कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटात त्यांनी रूपेरी पडदा गाजवलाय. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, इतक्या यशस्वी अभिनेत्रीचा मुलगा अनमोल ठकेरिया ढिल्लोंने आतापर्यत आईची एकही फिल्म बघितली नाही. यामागचं कारणही यापेक्षा जास्त आश्चर्य करणारं आहे.

अभिनेत्री पूनम ढिल्लों यांचा मुलगा अनमोल ठकेरिया ढिल्लोंने याच वर्षी संजय लीला भन्साळी निर्मीत Tuesdays & Fridays मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. हा चित्रपट गेल्याच महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता. अनमोलला जेव्हा विचारलं गेलं की, “तू आतापर्यंत तुझ्या आईच्या कोण-कोणत्या फिल्म्स पाहिल्या आहेत ?” यावर उत्तर देताना अनमोल जे काही म्हणाला त्यावर क्वचितच कुणाचा विश्वास बसेल. त्याला केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अनमोलने हसत सांगितलं, “मी प्रामाणिकपणे सांगतो, मी आतापर्यंत माझ्या आईचा कोणताच चित्रपट पाहिला नाही. त्यांच्या चित्रपटापासून मी थोडं दूरच राहणं पसंत करतोय..!”.

 

View this post on Instagram

 

A post shared by PoonamDhillon (@poonam_dhillon_)

यामागचं कारण सांगताना अनमोलने एक मजेदार गुपित देखील उघड केलंय. आईसोबत दुसरं कोणी तरी रोमांस करतंय हे पाहून त्याला विचित्र वाटत असल्याचं कारण अनमोलने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by PoonamDhillon (@poonam_dhillon_)

“हे पाहून मला थोडं अस्वस्थ वाटायचं, कारण मी त्यांचा मुलगा आहे. त्यांचे चित्रपट पाहताना मी लाजायचो. मी त्यांचे गाणे पाहिले आहेत. नूरी, सोनी, महीवाल चित्रपटाची गाणे किंवा मग ऋषि कपूर यांच्यासोबत गाजलेली गाणी मी पाहिले आहेत. त्यांची गाणी मी एन्जॉय करतो. आता सध्या आई जे नवीन काम करतेय, ते मी पाहतो. २०१९ मध्ये आई ने ‘जय मम्मा दी’ या चित्रपटात काम केलं होतं. यात त्यांनी आईची भूमिका केली होती. फक्त आईच्या तरूणपणातल्या चित्रपटात रोमांस करताना पाहून मी लाजतो, असं अनमोल ठकेरिया ढिल्लोंने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 5:40 pm

Web Title: poonam dhillon son anmol thakeria dhillon reveals why he does not watches mom old romantic films prp 93
Next Stories
1 “मला माझा गोरा रंग आवडतं नाही म्हणून…”, कंगना पुन्हा चर्चेत
2 ‘किन्नर बहू’ रूबीना दिलैक करोनाच्या जाळ्यात ; केलं स्वतःला आयसोलेट
3 “तुम्ही राक्षस आहात”, करोना काळात बनावट औषध विकणाऱ्यांवर संतापला फरहान अख्तर
Just Now!
X