अभिनेत्री पूनम पांडे चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि वादग्रस्त विधानांमुळे जास्त चर्चेत असते. मात्र यावेळी ती अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यामुळे चर्चेत आहे. राजने तिची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे. शिवाय याबाबत न्याय मागण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
राज कुंद्रा एक प्रसिद्ध व्यवसायिक आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार त्याने पूनम पांडेसोबत एका कंपनीत पैसे गुंतवले होते. ही कंपनी एका ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून व्यवसाय करणार होती. आणि त्यातून मिळालेला नफा दोघे ५०-५० टक्के वाटून घेणार होते. परंतु काही काळानंतर राजने तिच्या हिस्स्याचे पैसे देण्यास नकार दिला. शिवाय दोघांमध्ये असा कुठलाच करार झाला नसल्याचे तो सांगू लागला. असा पूनमने आरोप केला आहे.
त्यानंतर पूनम राज विरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेली. परंतु पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता तिने न्याय मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तिने राज कुंद्रा विरोधात फसवणूकीचे आरोप करत याचिका दाखल केली आहे.
राज कुंद्राने मात्र पूनमचे आरोप फेटाळून लावले आहेत. असा कुठलाच करार त्याने पूनमसोबत केला नव्हता अशी प्रतिक्रिया त्याने दिली. मला केवळ बदनाम करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचेही तो म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 6:57 pm