News Flash

पब्लिसिटी स्टंटसाठी पूनम पांडेने केलं पतीसोबत भांडण? अभिनेत्रीने सांगितलं सत्य

पूनम पांडेने पतीवर केले कौटुंबीक हिंसाचार आणि विनयभंगाचे आरोप

अभिनेत्री पूनम पांडे मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे पुढच्या सात दिवसांतच तिने आपल्या पती विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. त्यानंतर तिच्या पतीला गोवा पोलिसांनी अटक केली. लक्षवेधी बाब म्हणजे हा सर्व ड्रामा केवळ ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठी केला जातोय का? अशी चर्चा सर्वत्र आहे. मात्र या चर्चेवर स्वत: पूनम पांडे हिने प्रतिक्रिया दिली. “बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अजून मी खूप लहान आहे. वेळ आली की मी स्वत: निर्मात्यांशी संपर्क साधेन”, असं ती म्हणाली.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

बिग बॉस हा लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये प्रामुख्याने प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या कलाकारांना घेतलं जातं. पूनम पांडे देखील आपल्या ड्रामेबाजीमुळे नेहमीच चर्चेत असते. या पार्श्वभूमीवर पुनम आणि सॅम बॉम्बेमध्ये सुरु असलेलं हे भांडण केवळ बिग बॉसमध्ये जाण्यासाठी सुरु आहे की काय? अशी चर्चा सर्वत्र आहे. मात्र इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने या चर्चेवर भाष्य केलं. “सॅम आणि माझ्यात झालेलं हे भांडण खरं होतं. पण आमच्यातील मतभेद आता संपले आहेत. कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करण्यासाठी हे भांडण केलं नव्हत. मला अद्याप बिग बॉसची ऑफर मिळालेली नाही. आणि जर मिळाली तर मी त्यांना नाही म्हणेन कारण अजून मी या शोसाठी खूप लहान आहे. माझा अनुभव देखील खूप कमी आहे.” असं म्हणत पूनमने बिग बॉसच्या चर्चांना पुर्णविराम दिला.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

‘बिग बॉस’चं १४ वं पर्व लांबणीवर

गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे ‘बिग बॉस’च्या सेटवर पाणी साचलं. त्यामुळे सेट खराब झाला. शिवाय पाऊस सुरु असल्यामुळे सेट काढताही येत नाही. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा नवा सेट तयार केला जाईल. त्यानंतर ‘बिग बॉस’चं शूट सुरु होईल. या प्रक्रियेला किमान आणखी एक महिना लागेल असं क्रिएटिव्ह टीमने सांगितलं आहे. परिणामी ‘बिग बॉस’ चाहत्यांना १४ वं पर्व पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 4:17 pm

Web Title: poonam pandey publicity stunt sam bombay bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 खुशखबर! तारक मेहतामध्ये होणार दया बेनची एण्ट्री
2 सोफी टर्नरने पहिल्यांदाच पोस्ट केले गरोदरपणातील फोटो
3 महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल
Just Now!
X