News Flash

पूनम पांडेच्या ‘द विकेन्ड’ लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित

विशेष म्हणजे हा लघुपट मोबाइल युजर्ससाठी असल्याचे म्हटले जातेय.

आपल्या छायाचित्रांमुळे आणि इतर काही कारणांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेच्या ‘द विकेन्ड’ या लघुपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. तिच्या आधीच्या सर्व व्हिडिओंच्या तुलनेत या व्हिडिओत ती फार पुढे गेली आहे. या लघुपटासाठी तिने शॉवरखाली सेक्स सीनदेखील दिला आहे. त्यामुळे पूनमचा हा लघुपट आधीच वादात अडकला असून चर्चेचा विषय बनला आहे. या लघुपटास आर्यन सिंह याने दिग्दर्शित केले असून याची सहनिर्मिती स्वतः पूनम आणि सुरेश नाकुम यांनी केली आहे. विशेष म्हणजे हा लघुपट मोबाइल युजर्ससाठी असल्याचे म्हटले जातेय. द वर्ल्ड नेटवर्क्स बॅनर अंतर्गत बनलेल्या ‘द विकेन्ड’ हा लघुपट विशेष करुन भारतातील मोबाईल युजर्ससाठी बनवलेला पहिला प्रौढ लघुपट असेल.
‘द विकेन्ड’ लघुपट मूळ रुपात लोकांर्यंत पोहचावा म्हणून सेन्सॉर बोर्डाची यासाठी मान्यताही न घेण्यात आल्याचे पूनम पांडेने म्हटले आहे. त्याचसोबत ही पहिली व्हाइट लेबल्ड वेब पोर्टल फिल्म आहे. याविषयी बोलताना पूनम म्हणाली की, या कामुक रोमांचक लघुपटात काम करण्याचा अनुभव उत्तम होता. खरंतर या अनुभवास धडकी भरवणारा होता असे म्हणण्यासही हरकत नाही. चित्रीकरणादरम्यान अशाही काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मी घाबरून गेले होते. दिल्लीतील जोडप्यावर चित्रीत करण्यात आलेला हा भयपट २४ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 4:20 pm

Web Title: poonam pandey releases trailer of adult short movie
Next Stories
1 ‘रॉक ऑन २’चा दमदार टिझर प्रदर्शित
2 चुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी
3 ‘अ डॉट कॉम मॉम’
Just Now!
X