सासू-सुनांची न झेपणारी नाटकं , त्याला दिलेला खलनायकी तडका पाहता या मालिकाविश्वाला कंटाळलेल्या प्रेक्षकांचा कल जाणून घेत काही वाहिन्यांवर मोठय़ा धाडसी वृत्तीने खाणं, फिरणं, बागडणं, धमाल करणं या गोष्टींवर आधारित नव्या मालिका सुरू केल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर फिरणं कोणाला आवडत नाही..? मग हेच फिरणं इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी मिलिंद गुणाजी आणि शर्वरी जमेनीसनी केलेली ‘भटकंती’सुद्धा प्रेक्षकांना भावली होती. त्याच भटकंतीच्या बळावर अनेकांना त्यांच्या करिअरच्या वाटाही सापडल्या. आता हाच ट्रेंड काहीसा मॉडर्न झाला असून त्याला साथ मिळाली आहे ती म्हणजे काही सेलिब्रिटी चेहेऱ्यांची. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, रणवीर ब्रार, अभिनेत्री गुल पनाग, अभिनेता कुणाल कपूर, काही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि मॉडेल्स यांनी फिरण्याला खाण्याची, कधी फॅशनची, गाण्याची, अभिनयाची आणि खरं आयुष्य जगण्याची जोड देत काही सुरेख शोज प्रेक्षकांसाठी आणले. ‘फूड सफारी’, ‘रॉयल रसोई’, ‘फूड ट्रीपिंग’, ‘मास्टर शेफ’, ‘फूड ट्रक’, ‘फूड हायवे’सारखे शोज इतके लोकप्रिय ठरलेत की ‘फॉक्स लाइफ’, ‘फूड फूड’, ‘एपिक’, ‘लिव्हिंग फूड्स’, ‘टीएलसी’, ‘एम. टीव्हीसारख्या वाहिन्यांवर तर विविध संकल्पनांवर आधारित फूड ट्रॅव्हल शोजची एकच गर्दी झाली आहे.

‘ट्रॅव्हल विथ कुणाल’ या वेब सीरिजमधून मास्टरशेफ कुणाल कपूर ऑस्ट्रेलियाची खाद्यसंस्कृती, त्यांचं राहणीमान याची सफर करवणार आहे. याआधी कुणालने टेलीव्हिजनवर ‘पिकल नेशन’सारखा शो केला आहे. त्याच्या अमाप प्रसिद्धीनंतर आता नव्या माध्यमाशी जुळवून घेत कुणालने स्वत:च्या यूटय़ूब वाहिनीवर या शोचा घाट घातला आहे. यानिमित्ताने, फूड टॅव्हल शोजची लोकप्रियता वाढण्यामागची नेमकी कारणं काय याविषयी ‘रविवार वृत्तांत’ने त्याला बोलतं केलं. ‘सध्याच्या घडीला फिरणं, फिरण्यातूनच शिकणं आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याचं प्रस्थ वाढत चाललं आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे ‘कलिनरी टूरिझम.’ या प्रकारामध्ये नव्या ठिकाणांना भेट देऊन तेथील खाद्यसंस्कृतीचा अभ्यास केला जातो. काही प्रमाणात तेथील बारकावे टिपून त्या त्या प्रदेशाची कला, संस्कृती, इतिहास अशा शक्य तितक्या गोष्टी शिकणं आणि मग त्या लोकांपर्यंत पोहोचवणं याकडे अनेकांचा वाढता कल आहे. याचा फायदा जसा टेलीव्हिजनवरच्या ट्रॅव्हल शोजना झाला आहे. तसाच तो पर्यटन उद्योगासाठीही फायदेशीर ठरला आहे. ‘कलिनरी टुरिझम’चं कुतूहल झपाटय़ाने वाढतं आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. या कुतूहलामुळेच अशा शोजची संख्याही वाढते आहे, त्याची प्रेक्षकसंख्या वाढते आहे’, असे त्याने स्पष्ट केलं.

Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

फूड टॅव्हल शोजची ही लोकप्रियता केवळ टेलीव्हिजनपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर डिजिटल माध्यमावर त्याचा पसारा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. याबद्दल बोलताना, नेहमीचे फूड ट्रॅव्हल शो आणि त्याच संकल्पनेवर आधारित वेब सीरिज यामध्ये तसं पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाची मर्यादा असते ती म्हणजे वेळेची.. असं कुणाल सांगतो. अवघ्या काही मिनिटांच्या या भागात सर्व महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही सर्वात महत्त्वाची बाब असते. आणि थोडक्या वेळेत हवं ते पाहायला मिळत असल्याने वेब सीरिजच्या रूपाने आलेल्या शोजची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असंही तो म्हणतो. त्याच्याच आगामी ‘ट्रॅव्हल विथ कुणाल’ या शोचं उदाहरण तो देतो. ‘फिरणं हा माझा छंद आहे आणि या वेब सीरिजच्या माध्यमातून माझ्या या भटकंतीच्या छंदातून ऑस्ट्रेलियाची सफर मी प्रेक्षकांना घडवणार आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाच्या वाईनपासून तिथलं मगर आणि कांगारूच्या मटणाची लज्जत मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे’, असं तो सांगतो. अशा शोजमध्ये शेफ म्हणून त्यांचा असलेला पाककलेचा दांडगा अनुभव आणि त्या त्या प्रदेशाची स्थानिक वैशिष्टय़े यांची सांगड घालून काहीतरी नवं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतं. उदाहरणच द्यायचं तर ऑस्ट्रेलियामध्ये बुश नावाची एक वनस्पती आहे. जिचा वापर जेवणात केला जातो. तिची चव मुळातच खारट आहे. मला एका शेफने ती वनस्पती तळून खायला दिली. ते पाहून अचंबितच झालो. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू हा राष्ट्रीय प्राणी आहे हे खरं. तिथल्या स्थानिकांची वृत्तीसुद्धा या प्राण्याप्रमाणेच आहे. कधीही मागे न येणाऱ्या या प्राण्याप्रमाणेच ‘नेहमी पुढे जात राहा प्रगती करत राहा’ हा इथला मूलमंत्र आहे. या सगळ्या गोष्टी मला माझ्या शोजमधून मांडता आल्या आहेत. शिवाय, या सफरीवर तिथल्या शेफशी झालेल्या गाठीभेटींचा वृत्तांतही वेगळाच ठरला आहे, असं सांगत भविष्यातील अजून एका शोकडेही तो हलकेच इशारा करतो.  फूड आणि ट्रॅव्हल शो म्हणजे फक्त फिरणं आणि खाणं इतक्यापुरतंच मर्यादित न राहता त्यासाठी कमालीचा अभ्यास, पूर्वतयारी, जिज्ञासू वृत्ती, स्थानिकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि विविध परिस्थितीमध्ये जाऊन-राहून आपलं ध्येय पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. त्याच जोरावर या शोजचं वेगळेपण प्रेक्षकांच्या मनात ठसलं असल्याने असे शोज आणि खास या विषयाला समर्पित वाहिन्यांची नवनवीन रूपं येत्या काळात प्रेक्षकांना बघायला मिळतील, यात शंका नाही.