News Flash

‘बिग बॉस ११’मध्ये होणार ढिंच्याक पूजाची एण्ट्री?

आता 'बिग बॉस'च्या घरात गाणार ढिंच्याक पूजा

ढिंच्याक पूजा

नेहमीच वादविवाद आणि चर्चेत राहणाऱ्या ‘बिग बॉस’ या शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘बिग बॉस’चा ११ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी सोशल मीडियावर लीक झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील चर्चेत आलेल्या व्यक्ती या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होतात. सध्या आपल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध झालेली ढिंच्याक पूजा या शोमध्ये येणार असल्याची माहिती समोर येतेय.

आपल्या बेसूर आवाजाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या ढिंच्याक पूजाचे यूट्युब व्हिडिओ अनेक जणांकडून पाहिले जातात. ‘दारू दारू’, ‘सेल्फि मेने लेली आज’ नंतर ढिंच्याक पूजाचे ‘दिलो का शूटर’ हे गाणे आले होते. या गाण्यामुळे ती चांगलीच वादात सापडली होती. हेल्मेट न घालता ती गाडी चालवताना या व्हिडिओत दिसत होती. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल तिच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे ढिंच्याक पूजाचे बेसूर आवाजातील गाणी आता ‘बिग बॉस’च्या घरातही ऐकायला मिळतील असे म्हणायला हरकत नाही.

Video : आयला ! सोनू निगम ढिंच्याक पूजाचा फॅन?

ढिंच्याक पूजासोबतच इतरही स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन, ‘उतरन’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेला नंदीश संधू, टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा, ‘जमाई राजा’ मालिकेत भूमिका साकारलेली अंचित कौर ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनमध्ये सहभागी होणार आहेत.

वाचा : म्हणून ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले

त्याचप्रमाणे ‘हम साथ साथ है’ चित्रपटात नीलम आणि महेश ठाकूर यांच्या मुलीची भूमिका साकारलेली जोया अफरोज, अभिनेत्री नवनीत कौर ढिल्लन, ‘बडे अच्छे लगते है’मधील अभिनेता मोहीत मल्होत्रा, ‘बेगम जान’ चित्रपटात भूमिका साकारलेली मिस्टी चक्रवर्ती, ‘एम टीव्ही स्प्लिटविला’मध्ये झळकलेला अभिषेक मलिक यांचीही नावे चर्चेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 6:26 pm

Web Title: popular singer dhinchak pooja will come in big boss season 11
Next Stories
1 …म्हणून अर्जुन कपूर अजूनही ‘सिंगल’
2 अवघ्या ४८ मिनिटांतच एड शीरनचा मुंबई कॉन्सर्ट हाऊसफुल्ल!
3 ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘हानिकारक बापू’ उत्सुक
Just Now!
X