04 August 2020

News Flash

भारतात पाऊल ठेवायची माझी इच्छाही नाही- मिया खलिफा

पॉर्नस्टार मिया खलिफाने बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून ती बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त फेटाळले.

पॉर्नस्टार मिया खलिफाने बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून ती बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त फेटाळले. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. माझी भारतात पाऊल ठेवण्याचीही इच्छा नाही. त्यामुळे ज्याने कुणी मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची गोष्ट पसरवली असेल त्याची खैर नाही, अशा कडक शब्दांत मियाने आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉससाठी अनेक नावे चर्चेत असून त्यामध्ये खलिफाचेही नाव होते. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात पॉर्नस्टार सनी लिओनी सहभागी झाली होती तेव्हा या कार्यक्रमाला टीआरपी चांगलाच वाढला होता. पॉर्नहब डॉट कॉमनुसार गेल्या दोन वर्षात मियाचे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले गेलेले आहेत. त्यामुळे मियाला कार्यक्रमात सहभागी करून घेण्यामागे निर्मात्यांचा जास्त टीआरपी मिळण्याचा विचार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मियाने ही शक्यता साफ फेटाळून लावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2015 3:55 pm

Web Title: porn star mia khalifa denies being part of bigg boss 9 says she will never set foot in india
टॅग Entertainment
Next Stories
1 ‘कोंबडी पळाली’नंतर आता ‘कोंबडा पळाला..’
2 भीमसेन देठे, प्रतिमा जोशी यांना ‘दया पवार स्मृती पुरस्कार’
3 सुझानचे ऋतिकच्या मित्राशी शुभमंगल?
Just Now!
X