संजीव शर्मा दिग्दर्शित सिनेमा ‘सात उच्चके’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अलीगढसारखा हिट सिनेमा दिलेला अभिनेता मनोज बाजपई असणार आहेत. त्यांच्यासोबत अनुपम खेर, विजय राज, केके मेनन, अन्नु कपूर, अदिती शर्मा आणि अप्रशक्ती खुराना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे पोस्टर या नावाप्रमाणेच जरा हटके आणि देसी आहे. या पोस्टरमध्ये बस स्टॅण्ड आणि प्रसाधनगृहात लिहिण्यात येणाऱ्या शिव्या या पोस्टरवर लिहिल्या आहेत. शिवाय चोऱ्या करताना वापरली जाणारी साहित्यही या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चाव्यांचा गुच्छा, हातोडा, स्क्रू ड्रायव्हर, रस्सी, बंदूक यांसारखे साहित्य यात दाखवण्यात आले आहेत. हे सगळे साहित्य अशाप्रकारे सजवले गेले आहेत की ते जणू कोणाचे देवच वाटतील.
सिनेमाचे हे पोस्टर अनेक समिक्षकांनी ट्विट केले तर अभिनेता मनोज बाजपई याने हे ट्विट्स रिट्विट केले आहे. पुढच्या महिन्यात १४ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर तर फार दमदार आहेच. शिवाय यातल्या सगळ्या कलाकारांनी देसी लूक ठेवला आहे. आजही भारतातल्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये लागले जाणारे सी ग्रेड सिनेमांचे पोस्टर्स ज्या पद्धतीचे असतात त्याप्रमाणे या सिनेमाचेही पोस्टर थोड्याफार प्रमाणात करण्यात आले आहे. या सिनेमाची कथा ही सामान्य माणसाच्या जीवनावर आधारीत आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद संजीव शर्मा यांनी लिहिले आहे. तर संगीत बापी टुटुल, अभिषेक रे, जयदेव कुमार आणि विवेक कार यांनी दिली आहे. सिनेमाचे हे आगळे वेगळे पोस्टर पाहून या सिनेमाचा ट्रेलर कसा असेल याचीच उत्सुकता आता सगळ्यांमध्ये आहे.