बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, चित्रपट निर्माता करण जोहर डिझायनर प्रबळ गुरुंगला डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. या चर्चा प्रबळने करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या होत्या. आता प्रबळने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

प्रबळने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ‘प्यार किया तो डरना क्या’ असे लिहिले होते. त्यामुळे करण जोहर प्रबळला डेट करत आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. या सर्व चर्चांना थांबण्यासाठी आता प्रबळने त्याच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आम्ही फक्त एक मित्र आहोत असे लिहिले होते. ‘मी करण जोहरला डेट करत नाही. तो माझा खूप चांगला मित्र आणि माझ्या मोठ्या भावासारखा आहे’ असे त्याने लिहिले आहे. प्रबळने या ट्विटसह एक नोटही लिहिली आहे.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

खरंतर प्रबळने करण जोहरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा आणि करणचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला त्याने ‘प्यार किया तो डरना क्या. करण तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शन दिले होत्या. त्यावर लगेच करण जोहरने ‘भाऊ, स्वत:ला आवर घाल’ अशी कमेंट देखील केली होती. परंतु प्रबळने शेअर केलेल्या फोटो आणि कॅप्शनमुळे त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या होता. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

सध्या करण जोहर त्याचा आगामी चित्रपट ‘तख्त’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंह, विकी कौशल, करिना कपूर, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.