बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा ‘राधे श्याम’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात प्रभास सोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं एक नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. भगवान शिव-पार्वती यांच्या अजरामर प्रेमकहाणीचं स्मरण करण्याच्या हेतूने हे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ‘व्हेलेंटाईन डे’ ला या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.

‘राधे श्याम’च्या नव्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा बर्फावर पहुडल्याचं दिसतंय. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केलंय. “महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’ चं नवं पोस्टर शेअर करताना आनंद होतोय.” असं कॅप्शन प्रभासने या फोटोला दिलंय. इटली आणि रोममध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलंय. ‘राधे श्याम’ मध्ये रोमॅण्टिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. हिंदीसोबत हा सिनेमा कन्नड, मल्याळी, इंग्रजी आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. बिग बजेट असणाऱ्या या सिनेमात एकट्या प्रभासच्या वेषभूषेवर तब्बल 6 कोटी खर्च करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

राधा कृष्ण कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 30 जुलैला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रभास सोबत या सिनेमात सचिन खेडेकर, प्रियदर्शी, भाग्यश्री यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. प्रभासच्या सिमनेमांसाठी चाहत्यांमध्ये कायमचं उत्सुकता पाहायला मिळते.

एकाच वेळी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारा प्रभासचा हा पहिलाचं सिनेमा नाही. याआधी ‘बाहुबली’ चे दोन्ही भाग तसचं ‘साहो’ हे सिनेमे बहुभाषिक होते.