News Flash

…म्हणून प्रभास करायचा नील नितिन मुकेशच्या गर्भवती पत्नीला फोन

एका मुलाखतीदरम्यान नीलने या गोष्टीचा खुलासा केला आहे

२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटानंतर अभिनेता नील नितिन मुकेश दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससह ‘साहो’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाबाबतची रसिकप्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या चित्रपटातील कलाकार ‘साहो’चे प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान नीलने प्रभासशी संबंधीत एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

‘साहो’ चित्रपटात नील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे तो प्रभासला टक्कर देणार आहे. ऑनस्क्रीन दोन्ही अभिनेत्यांमध्ये टक्कर असली तरी ऑफस्क्रीन दोघेही खूप चांगले मित्र आहेत. चित्रपटाचे प्रमोशन सुरु असताना मुलाखतीमध्ये प्रभास एक अभिनेता म्हणून चांगला आहेच पण एक व्यक्ती म्हणून देखील तो खूप चांगल आहे असे नील म्हणाला आहे. जेव्हा नील चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असे तेव्हा प्रभास नीलच्या गर्भवती पत्नीला फोन करुन तिच्या तब्बेतीची विचारपूस करत असे असा खुलासा नीलने केला आहे.

‘साहो’च्या सेटवर नीलने प्रभाससह खूप वेळ एकत्र व्यतीत केला आहे. “प्रभास खूप चांगला व्यक्ती असल्यामुळे दाक्षिणकडे त्याला ‘डार्लिंग’ म्हणून संबोधले जाते. मी आता पर्यंत अनेक अभिनेत्यांसह काम केले आहे पण प्रभाससह मला काम करायला मिळाले हे माझे भाग्यच आहे” असे नील पुढे म्हणाला.

प्रभासच्या साहो चित्रपटत नील नितिन मुकेश व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी आणि महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शित सुजीत करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 12:16 pm

Web Title: prabhas every day calls neel nitin mukesh pregnant wife avb 95
Next Stories
1 ‘दिल चाहता है’च्या सिक्वलची चाहत्यांची मागणी, दिग्दर्शकांनी दिलं ‘हे’ उत्तर
2 Bigg Boss Marathi 2: विकेंडच्या डावात भाईजानमुळे येणार वेगळीच जान
3 दिशा पटानीच्या योग्यतेचा मी नाही – टायगर श्रॉफ
Just Now!
X