23 October 2020

News Flash

रेस्तराँमध्ये लावले ‘बाहुबली’, ‘राधेश्याम’चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट

जबरा फॅन! प्रभाससाठी रेस्तराँच्या इंटेरिअरमध्ये केला बदल

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हे नाव चाहत्यांसाठी नवीन राहिलेलं नाही. बाहुबली या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याची लोकप्रियता पार सातासमुद्रापार पोहोचल्याचं दिसून येतं. त्यातच प्रभास आता लवकरच ‘राधेश्याम’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या आगामी चित्रपटाचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रभासच्या चाहत्याने त्याला एक खास गिफ्ट दिलं आहे.

प्रभासच्या एका चाहत्याने अलिकडेच हैदराबाद येथे नवीन रेस्तराँ सुरु केलं असून या हे रेस्तराँ सध्या अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. पक्का लोकल असं या रेस्तराँचं नाव असून या रेस्तराँमध्ये प्रभासच्या चित्रपटांनुसार, संपूर्ण इंटेरिअर करण्यात आलं आहे. रेस्तराँचा मालक प्रभासचा मोठा चाहता आहे. त्यामुळे त्याने प्रभासच्या ‘बाहुबली’, ‘राधेश्याम’ या चित्रपटांचे पोस्टर भिंतींवर लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून त्याने एकप्रकारे प्रभासला गिफ्ट दिलं आहे, असं त्याचं मत आहे.

 

View this post on Instagram

 

Pakka Local Banjara Hills Now open to serve you with regional delicacies of India

A post shared by PAKKA LOCAL Restaurant (@pakkalocalrestaurant) on


दरम्यान, प्रभास सध्या त्याच्या आगामी राधेश्याम या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री पुजा हेगडे प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तसेच तेलुगू दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट एक बिग बजेट असणार असून २०२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 2:05 pm

Web Title: prabhas fan inaugurated his hotel with radheshyam poster ssj 93
Next Stories
1 त्या फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी
2 … म्हणून सायरा बानो यांनी केलं पाकिस्तान सरकारचं कौतुक
3 दिग्दर्शक अक्षय इंडीकरचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक
Just Now!
X