News Flash

Video : चाहतीने प्रभासच्या कानशिलात लगावली, जाणून घ्या सविस्तर

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

आज काल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्यामुळे कधी कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल याचा नेम नसतो. खास करुन आपल्या आवडत्या कलाकारासोबत फोटो किंवा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्याचा अनेक चाहत्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे चाहते जिथे दिसतील तेथे कलाकारांना भेटण्याचा प्रयत्न करतात. अशातच अनेक मजेदार घटना घडत असतात. त्या मोबाईलमध्ये कैद होतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत असेच काहीसे झाले आहे. सध्या त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रभास विमातळावरुन बाहेर पडताना दिसत आहे. तितक्यात एक चाहती फोटो काढण्यास प्रभासला विनंती करते. प्रभास चाहतीच्या विनंतीचा मान ठेवून तिच्यासोबत फोटो काढण्यास तयार होतो. फोटो काढल्यानंतर चाहतीला प्रचंड आनंद झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसून येते. दरम्यान आनंदात असलेली चाहती उत्साहाच्या भरात प्रभासच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करते. मात्र तिचा हात प्रभासच्या गालाला जोरात लागतो. त्यामुळे त्या चाहतीने प्रभासच्या कानाखाली मारल्यासारखे वाटते.

त्यानंतर प्रभासचा दुसरा चाहता येतो आणि त्याच्या सोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी प्रभास गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे पाहायला मिळतो. प्रभास चाहतीने गालावर जोरात मारल्याने गालावरुन हात फिरवताना दिसून येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 4:06 pm

Web Title: prabhas female fan slap him in lovidavi way at airport avb 95
Next Stories
1 फोटोत दिसणारी ‘ही’ चिमुकली आज गाजवते बॉलिवूडवर राज्य
2 ‘तानाजी’ चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार सेक्रेड गेम्समधील ‘हा’ अभिनेता
3 ‘तानाजी’ चित्रपटामध्ये ‘हा’ अभिनेता साकाराणार शिवाजी महाराजांची भूमिका; पाहा फर्स्ट लूक
Just Now!
X