News Flash

प्रभासचा ‘साहो’ या कारणासाठी असेल खास

सध्या या सिनेमाचे तिसरे शेड्युल सुरू आहे

प्रभास

तमिळ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाचे प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे. या सिनेमात तो कोणत्या रुपात पाहायला मिळणार, याचाच विचार सध्या त्याचे चाहते करत आहेत. ‘साहो’ सिनेमा चित्रीत करताना कोणताही सीन लीक होऊ नये, याची योग्य ती काळजीही घेण्यात येत आहे. अॅक्शन थ्रिलर असणाऱ्या या सिनेमाविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रभास आणि श्रद्धा कपूरचे चाहते उत्सुक आहेत. ही उत्सुकता पाहूनच आम्ही तुमच्यासाठी या सिनेमाशी निगडीत एक खास गोष्ट घेऊन आलो आहोत.

सध्या या सिनेमाचे तिसरे शेड्युल सुरू आहे. लवकरच या सिनेमाचे नवीन पोस्टर किंवा टीझर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पहिल्या पोस्टरमध्ये प्रभासच्या व्यक्तिरेखेबाबत फारसे कळू शकले नव्हते. पण त्याचे खरे कारण आता कळले आहे. ‘इंडिया डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या सिनेमात प्रभासचा लूक हीच सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. या सिनेमात तो एक नाही तर दोन भूमिका साकारणार आहे. प्रभासने आतापर्यंत त्याच्या प्रत्येक सिनेमात त्याच्या लूक बदलण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर प्रभासचे हे दोन्ही लूकही त्याच्या आधीच्या सिनेमांच्या लूकपेक्षा खूप वेगळे असणार आहेत.

Saaho साहो

बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले असेल, याची जाणीव साहोचा दिग्दर्शक सुजीथला पूर्णपणे आहे. त्यामुळेच या सिनेमात कोणतीही उणीव राहू नये, याची पूर्ण काळजी तो घेत आहे. चाहत्यांना एक वेगळाच प्रभास दाखवण्यासाठी सुजीथ दिवस- रात्र काम करत आहेत. प्रभाससोबत या सिनेमात श्रद्धा कपूर आणि नील नितेश मुकेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 5:09 pm

Web Title: prabhas look in saaho this latest detail will make your wait to watch the film all the more difficult
Next Stories
1 महिलांसाठी आपल्या समाजात मैत्रीपूर्ण वातावरण नाही; ‘पद्मावती’ वादावर मिस वर्ल्ड मानुषीची प्रतिक्रिया
2 PHOTOS : ‘कॉमेडी क्वीन’च्या लग्नाची लगबग सुरु
3 ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार ‘पद्मावती’?
Just Now!
X