28 February 2021

News Flash

प्रभास करणार ‘या’ एनआरआय मुलीसोबत लग्न?

प्रभास करणार अरेंज मॅरेज?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट हँडसम बॅचरल कोण असा प्रश्न विचारला तर सहाजिकच अभिनेता प्रभासचं नाव प्रथम घेतलं जाईल. बाहुबली या चित्रपटानंतर प्रभासची लोकप्रियता तुफान वाढली असून तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. अनेकदा त्याचं नाव अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबतदेखील जोडलं गेलं. मात्र, प्रभास अनुष्कासोबत नव्हे तर एका एनआरआय मुलीसोबत करणार असल्याचं ‘बॉलिवूड लाईफ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘बाहुबली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रभास-अनुष्काच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा आहे. परंतु, प्रभास अनुष्कासोबत नाही तर एका एनआरआय मुलीसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे प्रभासचं लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : शेतकरी आंदोलन : सोनाक्षी सिन्हाचा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना पाठिंबा

प्रभासची होणारी पत्नी अमेरिकत वास्तव्यास असून तिचे वडील एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. प्रभास आणि या मुलीच्या कुटुंबीयांनी चर्चा करुन हे लग्न ठरवलं आहे. तसंच प्रभासनेदेखील या लग्नाला होकार दिला आहे.

दरम्यान, प्रभास सध्या त्याच्या ‘राधेश्याम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्यानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार आहे. परंतु, अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 8:52 am

Web Title: prabhas marriage to nri businessman daughter ssj 93
Next Stories
1 ‘विनोद हाच आमचा ऑक्सिजन’
2 ‘फॅण्ड्री’नंतर सोमनाथ अवघडेचा नवा चित्रपट; पहिल्यांदाच दिसणार नव्या रुपात
3 शेतकरी आंदोलन : सोनाक्षी सिन्हाचा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना पाठिंबा
Just Now!
X