23 January 2021

News Flash

पूजा हेगडे आणि प्रभासचा रोमँटिक अंदाज, प्रदर्शित झाला फर्स्ट लूक

'राधे श्याम' या चित्रपटात ते एकत्र काम करणार आहेत.

दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभासचा लवकरच ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरु होत्या. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रभास यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

पूजा हेगडेने सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजाचा रोमँटिंक अंदाजात दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच प्रभासने देखील सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत, ‘माझ्या चाहत्यांसाठी खास गिफ्ट. मला आशा आहे की तुम्हाला हे आवडेल’ असे म्हटले आहे.

चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर हॅशटॅग पूजा हेडगे ट्रेंड होऊ लागला. चाहते प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री पाहायला उत्सुक झाले आहेत. जेव्हा प्रभासने या चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हा ‘प्रभास २०’ या हॅशटॅगने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते.

टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तसेच तेलुगू दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट एक बिग बजेट असणार असून २०२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा आणि प्रभास सोबतच भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन हे कलाकार देखील दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 2:07 pm

Web Title: prabhas movie radhe shyam pooja hegde first look avb 95
Next Stories
1 विकास दुबे एन्काउंटर, पलटलेली गाडी अन् रोहित शेट्टी; जाणून घ्या तिघांमधील कनेक्शन काय?
2 Video : ‘दिल बेचारा’मधील गाण्यात दिसला सुशांतचा अनोखा अंदाज
3 म्हणून शाहरुखच्या पाठी दगड घेऊन धावले होते कर्नल राज कपूर
Just Now!
X