News Flash

वाढदिवशी प्रभासच चाहत्यांना देणार ‘सरप्राइज’

प्रभास करणार एक महत्त्वपूर्ण घोषणा

प्रभास

एस.एस. राजामौली दिग्दर्शित बॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली २’मध्ये ज्याप्रकारे अमरेंद्र बाहुबाली त्याच्या प्रजेवर प्रेम करतो, त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यातही अभिनेता प्रभासचं त्याच्या चाहत्यांशी एक अनोखं बंध आहे. प्रेम आणि कौतुकांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचं महत्त्व प्रभासच्या आयुष्यात खूप आहे. म्हणूनच येत्या २३ ऑक्टोबरला त्याच्या वाढदिवशी चाहते त्याला काही भेट देण्याआधीच तोच चाहत्यांना एक स्पेशल सरप्राइज देण्याचा विचार करत आहे. ३८ व्या वाढदिवशी प्रभास एक महत्त्वाची घोषणा करणार आहे. ही घोषणाच त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राइज ठरणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभास ही घोषणा करणार आहे. नेमकी ही घोषणा कशासंदर्भात असणार आहे, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या तो ज्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे त्या ‘साहो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

PHOTOS: तैमुर अशी साजरी करतोय त्याची पहिली दिवाळी

‘बाहुबली २’च्या प्रदर्शनाबरोबरच ‘साहो’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या टीझरला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळालेला. प्रभासच्या या चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 8:12 pm

Web Title: prabhas plans a surprise for fans on his birthday
Next Stories
1 PHOTOS: तैमुर अशी साजरी करतोय त्याची पहिली दिवाळी
2 ३५ वर्षांनंतर कीर्ती कॉलेजने आयएनटीवर कोरले आपले नाव
3 या अभिनेत्याने केले लिंगबदल, आता ओळखूही शकणार नाही
Just Now!
X