News Flash

प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर ‘राधेश्याम’ची भुरळ; ४ दिवसात रचला ‘हा’ इतिहास

पाहा, प्रभासच्या 'राधे श्याम'ने कोणता विक्रम रचला

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा आगामी राधेश्याम हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक, पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकप्रिय ठरत आहे.

अलिकडेच राधेश्यामचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरला तब्बल २५ मिलिअन व्ह्युज मिळाले आहेत. हे पोस्टर खास प्रभासच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरला ‘बीट्स ऑफ राधेश्याम’ असंही म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे केवळ चार दिवसांमध्ये २५ मिलिअन व्ह्युज मिळवून या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

दरम्यान, ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यात प्रभास विक्रमादित्य ही भूमिका साकारत आहे, तर पूजा प्रेरणा ही भूमिका वठविणार आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असून प्रेक्षकांमध्ये प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:42 pm

Web Title: prabhas radhe shyam new record ssj 93
Next Stories
1 …तेव्हा समजलं बिग बी अन् माझ्यातलं अंतर; शाहरुखने सांगितला ‘मोहब्बतें’च्या सेटवरचा अनुभव
2 आता श्रद्धा कपूर साकारणार ‘इच्छाधारी नागिण’
3 आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे; शालिनी ठाकरेंचा इशारा
Just Now!
X