News Flash

प्रभाव प्रभासचा; साहोच्या एका तिकीटाची किंमत पाहून व्हाल थक्क

साहो चित्रपटाचे इतके महाग तिकीट घेण्यासाठीसुद्धा चाहत्यांनी पहाटे चार वाजल्यापासूनच अक्षरश: पाच कोलोमीटर पर्यंतच्या रांगा लावल्या आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाची चाहते अक्षरश: डोळ्यात तेल घालून वाट पाहात होते. अखेर हा चित्रपट शुक्रवारी (३० ऑगस्ट) प्रदर्शित झाला आहे. ड्रामा आणि जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला ‘साहो’ पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. तिकीटाच्या भरमसाठ मागणीमुळे साहोचे एक तिकीट चक्क दोन हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकले जात आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे इतके महाग तिकीट घेण्यासाठीसुद्धा चाहत्यांनी पहाटे चार वाजल्यापासूनच अक्षरश: पाच कोलोमीटर पर्यंतच्या रांगा लावल्याचे दिसून येत आहे.

साहो या अ‍ॅक्शनपटात बाहुबली फेम प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. ३५० कोटींच्या या बिग बजेट चित्रपटाच्या जाहिरातीवर निर्मात्यांनी कोट्यावधींचा खर्च केला, मात्र प्रभासची लोकप्रियताच चाहत्यांना सिनेमागृहांजवळ खेचत असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगु, मल्याळम व हिंदी या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बाहुबलीच्या तुफान यशानंतर अभिनेता प्रभासचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 9:33 am

Web Title: prabhas saaho shraddha kapoor saaho tickets saaho movie showtimes mppg 94
Next Stories
1 कर्करोगावर मात केल्यानंतर शरद पोंक्षेंचं थेट रंगभूमीवर पुनरागमन
2 किशोरी शहाणे व दीपक बलराज यांच्‍या प्रेमकथेचा उलगडा
3 ‘सिंधू’मध्ये हरतालिकेचे व्रत, मोदक, आरती आणि बरंच काही…
Just Now!
X